शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार देणार सामूहिक राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:03 IST

शिधावाटप दुकानदारांना कमिशनऐवजी तामिळनाडू राज्याच्या पार्श्वभूमीवर अनुदान देण्याची मागणी करत, मुंबई रेशन दुकानदार संघटनेने रेशन दुकानदारांचे सामूहिक राजीनामे स्वीकारण्याचे अनोखे

मुंबई : शिधावाटप दुकानदारांना कमिशनऐवजी तामिळनाडू राज्याच्या पार्श्वभूमीवर अनुदान देण्याची मागणी करत, मुंबई रेशन दुकानदार संघटनेने रेशन दुकानदारांचे सामूहिक राजीनामे स्वीकारण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. मुंबईतील सर्व रेशन दुकानदारांनी त्यांचे राजीनामे संघटनेकडे सुपुर्द करण्यास सुरुवात केल्याची माहिती अध्यक्ष नवीन मारू यांनी दिली आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील शिधापुरवठा ठप्प होणार असून, बायोमेट्रिक वापरासही विलंब होणार आहे.तुटपुंज्या कमिशनऐवजी सरकारने थेट शहरी भागात ७० हजार रुपये आणि ग्रामीण भागात ४० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी संघटनेने केल्याचे मारू यांनी सांगितले. मारू म्हणाले की, शिधापुरवठ्यातून दुकानदारांना नफा तर दूरच, पण सर्व खर्च पकडल्यास प्रचंड तोट्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना कमिशनऐवजी सरकारने सर्व खर्च आणि नफ्याच्या बदल्यात अनुदान द्यावे, अशी संघटनेची मागणी आहे.मुंबईमधील ए, डी, ई व जी विभागातील दुकानदार त्यांचे राजीनामे संघटनेच्या अध्यक्षांकडे जमा करतील. त्यामुळे या विभागातील शिधापुरवठाही बंद होणार आहे. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर सर्व राजीनामे सरकारकडे जमा केले जातील. बायोमेट्रिक मशिनबाबत शिधावाटप दुकानदारांना अद्याप पुरेशी माहिती नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर आपोआपच मशिनचा वापरही दुकानदार करणार नसल्याचे मारू यांनी स्पष्ट केले.