शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात सुट्टीच्या दिवशी खाजगी लोकांकडून रेशनकार्डची कामे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:44 IST

प्रकरण पोलीस ठाण्यात; काहीही गैर नसल्याचा तहसीलदारांचा दावा

नालासोपारा : वसईच्या तहसील कार्यालयात अनेक खाजगी लोकांकडून कामे करवून घेतली जातात. शुक्रवारी गुडफ्रायडे या सरकारी सुटीच्या दिवशीही खाजगी लोकांकडून रेशन कार्डसंबंधी काही कामे करून घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यावर काही पत्रकारांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेथे धाव घेत पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी वसई पोलीसही हजर होते.वसई तहसील कार्यालयात बेकायदेशीरपणे अनेक खाजगी लोक काम करतात. सदर प्रकरणी वारंवार तक्रारी करून पाठपुरावा केल्यानंतर शासकीय कार्यालयातून खाजगी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी आदेश काढला. मात्र, आदेशाला धाब्यावर बसवून कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. शुक्रवारी शासकीय सुटी असताना तहसील कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांकडून पुरवठा अधिकारी रोशन कापसे काम करून घेत असल्याची माहिती वसईतील काही पत्रकारांना मिळाली. लगेचच पत्रकारांनी तहसील कार्यालयात बसून कामे करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण केले. हेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे प्रकरण शेवटी वसई पोलीस ठाण्यामध्ये गेले. वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांनाही वसई पोलीस ठाण्यात जावे लागल्याचे कळते. नेहमी कामाचा भार आणि सर्व्हर डाऊन असल्याने सुट्टीच्या दिवशी काम केले जात असल्याचे सांगून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.सुटीच्या दिवशी जसे रुटीन काम सुरू असते, त्याप्रमाणे काम सुरू होते. जो आरोप करण्यात आला आहे तसे काहीही नव्हते. मी पोलीस ठाण्यात गेलेली पण दुसऱ्या कामानिमित्त पोलीस निरीक्षकांना भेटण्यास गेले होते.- उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसईयाबाबत माहिती मिळाल्यावर तहसील कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची टीम पाठवली होती. तहसीलदार मॅडमना फोन करून तक्रार केल्याची माहिती दिल्यावर त्या स्वतः वसई पोलीस ठाण्यात आल्या होत्या.- कल्याणराव कर्पे, पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.