शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये पावसाचा जोर; बळीराजाला धास्ती

By admin | Updated: July 16, 2017 02:17 IST

जव्हार तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी कायम होता, सकाळी थोडा वेळ उघडीप दिल्यानंतर दुपारपासून त्याने तालुक्याला

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी कायम होता, सकाळी थोडा वेळ उघडीप दिल्यानंतर दुपारपासून त्याने तालुक्याला झोडपण्यास सुरवात केली. पावसाची परिस्थिती जैसे थे आहे. शुक्रवारी तालुक्यात १२७ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली तर आता पर्यत १६३८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रभारी नायब तहसीलदार प्रताप तारगे यांनी दिली.बुधवार रात्रीपासून पडणाऱ्या धो-धो पावसामुळे ६८ तासांत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे, काही वर्षापूर्वीची पुनरावृत्ती जव्हार तालुक्यात झाल्याची चर्चा शहरात असून असा पाऊस मागील काही वर्षापूर्वी पडला होता, जून ७ पासून सुरू होणाऱ्या पावसाची थेट आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यत संततधार या भागात सुरू असायची, सूर्य दर्शनही महिना महिना घडत नव्हते, तशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून येथे आहे. तसेच कमी उंचीच्या रस्त्यांवरील मोऱ्या पावसामुळे भरून ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो खेडोपाड्यांचा संपर्क काही काळ तुटला होता. मागील महिन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावून शेती उपयुक्त वर्षाव केल्यामुळे बळीराजा सुखावला होता, व त्यांनी मोठ्याप्रमाणात शेतात भात, नागली, वरई आदींचा पेरा केला होता. तो संपूर्ण वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. त्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.