शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे यंदा रब्बी हंगाम अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:03 IST

जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त; भाजीपाला पिकाला बसणार फटका

- राहुल वाडेकर विक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा लांंबलेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. मात्र आता त्याचे पडसाद रब्बी हंगामावरही पडताना दिसत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी-अधिक होत असतानाच, वारंंवार होत असलेले ढगाळ वातावरण आणि मध्ये मध्ये रिमझिम पावसाचा शिडकावा यामुळे वातावरणात होत असलेले बदल यामुळे आता रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे.वातावरण स्वच्छ नसल्याने याचा परिणाम पिकांवर होऊन लागवड केलेले उडिदाचे पीक, तुरीचे पीक हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे, तर तीळ व वालाची वाढ खुंटणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र होऊ लागले आहे. या हंगामात शेतकरी मुग, हरभरा, वाल, उडीद, तुर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाला पिके घेतात. रंब्बी हंगामात बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट भरून काढली जाते. या वर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली, मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाउस झाल्याने काही भागात भात पीक वाहून गेले, तर काही भागांत भात कुजण्याचे प्रकार घडले. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भात शेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड केली. जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली. मूग, हरभरा, तुर फुलोरा येऊन शेंगा व हरभºयाला घाट्या लागल्या आहेत. मात्र गेले काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटल्याने याचा परिणाम तीळ, उडीद व वालाच्या रोपांच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली आहे. असे असताना ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचा परिणाम झेंडूच्या रोपांच्या वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारंवार वातावणामध्ये बदल होत असून कधी कमी-अधिक थंडी तर कधी ढगाळ वातावरण याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. थंडीचे कमी-अधिक प्रमाण होत असल्याने कडधान्यांच्या रोपांची वाढ खुंटली आहे.-पंढरीनाथ सांबरे, शेतकरीवारंवार बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तीळ, उडीद, तुर, हरभरा पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड