शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या पेट्रोलदराचा सीमेवरील पंपाना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:11 IST

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी  - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे.विविध करांची आकारणी केली जात असल्याने गुजरात पेक्षा मुंबई आणि लगतच्या भागात पेट्रोलचा प्रतिलीटर दर सुमारे आठ रु पयांनी अधिक आहे. त्याचा फटका पालघर जिल्ह्यातील सीमा भागाच्या पंप चालकांना बसत आहे. डहाणू तालुक्यात दहा आणि तलासरीतील पाच असे एकूण पंधरा पंप आहेत. नवीन दरानुसार आपल्याकडील पेट्रोलचे प्रति लिटर दर ८२.१५ रु पये तर लगतच्या गुजरात मधील उंबरगाव तालुक्यात ७३.९२ रु पये दर आहेत. ही तफावत सुमारे आठ रु पयांची आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ग्राहक थेट गुजरात गाठून पेट्रोल भरण्यास प्राधान्य देतात.त्याचा थेट परिणाम पंप चालकांच्या उत्पन्नावर होत आहे. एकीकडे इंधनदारात वाढ तर दुसरीकडे दरात असलेल्या कमालीच्या ताफवतीमुळे नागरिकांमध्येही शासनाप्रति असलेला रोष वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, डिझेलचा प्रति लीटर दर हा आपल्याकडे ६८.२९ रु पये असून गुजरातला ६७.२३ रु पये आहे. साधारणत: तिथल्या पेक्षा आपल्याकडील दर केवळ दोन रु पयांनीच जास्त आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपVasai Virarवसई विरार