शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

संदिप वैद्य जव्हारचे नगराध्यक्ष

By admin | Updated: September 15, 2015 23:03 IST

जव्हारच्या नगराध्यक्षपदी संदीप वैद्य तर उपनगराध्यक्षपदी आशा बल्लाळ यांची अवघ्या एक मताच्या अधिक्याने आज निवड झाली. वैद्य यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश

जव्हार : जव्हारच्या नगराध्यक्षपदी संदीप वैद्य तर उपनगराध्यक्षपदी आशा बल्लाळ यांची अवघ्या एक मताच्या अधिक्याने आज निवड झाली. वैद्य यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश रजपूत यांना ८ मते तर आशा बल्लाळ यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेच्या अमोल औसरकर यांना ८ मते मिळाली. त्यामुळे सत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच गेली. सार्वत्रिक निवडणुकीनुसार अडीच वर्षाच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाकरीता निवडणूक होते. मात्र त्यापूर्वीच नगर पलिकेत राजकीय गदारोळ सुरू झाला आणि काही दिवसांसाठी निवडणुकीची ही प्रक्रिया लांबली होती.जव्हार नगर परिषदेची निवडणूक ४ नोव्हे. २०१२ मध्ये झाली. नगराध्यक्ष तथा उपाध्यक्षांचा कार्यकाळ जून २०१५ मध्ये संपला. या मध्यस्थीच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी नवीन गट स्थापन केला. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्याला मान्यता दिली. मात्र, तत्कालीन नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी त्यांच्यावर नियमबाह्य गट स्थापन केल्याच्या ठपका ठेवत न्यायालयात धाव घेतल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या १० नगरसेवकांचे पद रद्द केले, मात्र त्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णया विरूध्द उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार या विशेष सभेचे आयोजन करून तिचे पीठासीन अधिकारी म्हणून जव्हार उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. काही महिंन्यांपासून नगर पालिकेच्या राजकीय गदारोळामुळे सगळी कामे ठप्प झाली होती, एकही निर्णय मार्गी लागत नव्हता. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबल्याने शासनाने अध्यक्षपदाचा पदभार जव्हारचे तहसीलदार अरूण कनोजे यांच्यावर सोपवला होता. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने मोठे निर्णय घेण्यासाठी अडथडे निर्माण होत होते. नगर पालिका हे राजकारणाचे सभागृह नाही, आम्ही गावाच्या विकासाठी प्रत्येक क्षण घालवू. पाणी पुरवठा, बेरोजगारी व पर्यटन विकासाकडे लक्ष वेधण्याचे प्रत्यन करू.- संदिप वैद्य, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, जव्हार नगरपरिषदराष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असली तरी, आमचीही संख्या कमी नाही. विरोधी पक्षात असलो तरी सुध्दा काय करू शकतो हे जव्हारच्या जनतेला दिसेल.- अमोल औसरकर, सभापती, सार्व. बांधकाम व दिवाबत्ती समिती, जव्हार नगर परिषदमिरवणूकीत राष्ट्रवादीच्या झेंड्यांसोबत बीजेपीचे ही झेंडे फडकविण्यात आले, आम्ही राष्ट्रवादीला कुठलेही सर्मथन दिलेले नाही. ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.- भरत सोनार, जव्हार तालुका सरचिटणिस, बी.जे.पी.