शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे नियोजन करताना संस्कृतीची ओळख जपणार

By admin | Updated: August 15, 2015 22:44 IST

आपल्या नवनिर्मित पालघर जिल्ह्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करून विकासाचे नियोजन करताना इथल्या संस्कृतीची ओळख कायम राहावी,

पालघर : आपल्या नवनिर्मित पालघर जिल्ह्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करून विकासाचे नियोजन करताना इथल्या संस्कृतीची ओळख कायम राहावी, असा माझा प्रयत्न असेल असे उद्गार आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर येथे काढले.भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, दत्ता भडकवाड, मनीषा पिंगळे इ.सह उपस्थित मान्यवरांनी ध्वजाला वंदन केले.जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा तळमळीने काम करीत असून या यंत्रणेच्या सहकार्याने सर्व स्तरांवरचा विकास करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला असून पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी भागांतील ५१ गावांमध्ये कामे सुरू असून १ कोटी ७५ लाख लीटर इतका अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई दूर होऊन वर्षभर शेतात पिके घेणे शक्य होणार असल्याने स्थलांतरासारखा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण निधीपैकी पाच टक्के निधी दरवर्षी ग्रामपंचायतीकडे आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने पेसा कायद्यांतर्गत घेतला असल्याचे सांगून गावागावांत पायाभूत सुविधा, आरोग्य, रस्ते, शिक्षण या चांगल्या सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.तलासरी : तलासरीत भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तलासरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार गणेश सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीसांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात तलासरीतील शाळा कॉलेजचे विद्यार्थ्यांबरोबर डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आ. पास्कल धनारे, खा. चिंतामण वनगा, सभापती वनशा दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, तसेच जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.