शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:16 IST

कडेकोट सुरक्षा व्यवस्था : १६०० अधिकारी, कर्मचारी, पोलीस तैनात

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघासाठक्ष झालेल्या मतांची मोजणी येथील सूर्या कॉलनी, शासकीय गोदाम क्र . २ येथे २३ मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक गौरव सिंग, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उपस्थित होते. मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे १ हजार ६०० अधिकारी- कर्मचारी मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

सहा विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक ३५ आणि पालघर मतदारसंघात सर्वात कमी २३ फेºया होतील. याशिवाय डहाणू मतदारसंघात २४ तर विक्र मगड, बोईसर आणि वसई मतदारसंघात प्रत्येकी २५ फेºया होतील. मतमोजणीची रंगीत तालिम मंगळवार दि २१ मे रोजी घेण्यात आली.

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी विक्र मगड, पालघर, डहाणू, बोईसर, नालासोपारा, वसई अशा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १८,८५,२९७ मतदारांपैकी १२,०१,२९८ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ६३.७२ इतकी आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे.मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी तैनातमतमोजणीसाठी प्रत्येक टेबलिनहाय पर्यवेक्षक, सहा. पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक असे अधिकारी असणार आहेत. या व्यतिरिक्त संगणक कामासाठी, इव्हीएम स्ट्राँगरूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतिपत्रका मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विविध समित्यामधील कर्मचारी जबाबदारी सांभाळणार आहेत.आयोगाच्या निकषानुसार स्ट्राँग रु मला त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे.याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पथकाला विशिष्ट रंगाचे टीशर्टस तसेच बॅजेस देण्यात येणार आहेत जेणे करून कुठलाही संभ्रम होणार नाही.मतमोजणी केंद्र येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.मोबाईल वापरावर बंदीनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि २३ मे रोजी मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल फोन, लॅपटॉप आदी आणता येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.