शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू; डिसेंबरपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:36 IST

महापौरांच्या आदेशानंतर जलतरण तलाव लवकरच सुरू होणार

- आशिष राणे वसई : वसई-विरार शहर महापलिकेचा नवघर माणिकपूर येथील ओमनगर भागातील आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.डिसेंबर २०१९ पासून दुरुस्तीच्या कामासाठी हा तलाव बंद ठेवण्यात आला होता. आता या आठवड्यात पाणी फिल्टरेशनचे काम पूर्ण होताच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती ‘एच’ प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला दिली.या संदर्भात नागरिकांची तक्र ार आल्यावर २० डिसेंबर रोजी त्याची पाहणी केली असता, या तलावाला गळती लागल्याचे लक्षात आले होते. याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसल्यावर ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात ‘दररोज शेकडो लिटर पाणी वाया’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापौर प्रवीण शेट्टी यांनी लागलीच युद्ध पातळीवर या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.ज्यांनी वर्षभराचे पास काढले आहेत, त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बंद असलेल्या काळातील दिवस भरून मिळतील, असे आश्वासनही महापौर शेट्टी यांनी दिले आहे.दरम्यान, डिसेंबरमध्ये या तरणतलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे समोर आले होते. ही गळती होत असलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पालिका तसेच स्विमिंग पुलाच्या व्यवस्थापनाकडे केली होती.त्यानुसार, या तरणतलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम हाती घेऊन नेमकी गळती कुठून होत आहे याचा बोध होत नव्हता. आणि बांधकाम तसेच पाणी खाते यांच्यात या दुरुस्तीवरून तू - तू - मैं - मैं होत होती.‘लोकमत’ने वृत्त छापल्यानंतर महापौरांनी तत्काळ कार्यवाही करत या दोन्ही विभागाला धारेवर धरत काम सुरू केले.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, पोहण्यास येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात ज्यांनी सहा महिने आणि वर्षभराचा पास काढला, त्यांचे दोन महिन्यांचे पैसे वाया गेले.वसई पश्चिमेतील नवघर माणिकपूर परिसरात महापालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर सें.मी. लांबीचा आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. येथे सकाळ व संध्याकाळी नागरिक येतात.एप्रिल २०१९ मध्ये याच तलावात बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आला.त्यानंतर पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या चौकशीनंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये हा तरणतलाव महापालिकेने पुन्हा सुरू केला होता.