शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विकासात राजकारण नको-चौधरी

By admin | Updated: May 4, 2016 00:52 IST

विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र करून पालघर जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्याऱ्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून प्रशासन पारदर्शकपणे काम करेल मात्र विकासकामामध्ये कोणी राजकारण

पालघर : विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र करून पालघर जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्याऱ्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून प्रशासन पारदर्शकपणे काम करेल मात्र विकासकामामध्ये कोणी राजकारण आणू नये असे पालघर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले.पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनावर चांगला ठसा उमटवतांना जिल्ह्यातील २ हजार २०५ शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा बहुमान मिळविला. शनिवारी त्यांच्याकडून निधी चौधरी यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज पत्रकारांशी वार्तालाप केला. आपणास आरोग्य व शिक्षण या दोन क्षेत्रामध्ये भरीव कार्य करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आपणास अपेक्षित असून प्रशासन काम करीत नसेल, काही चुका असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्या, त्या नक्कीच सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी या सन २०१२ मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊन आपएएस झाल्या असून त्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून ६ वर्षे काम केले आहे. तसेच इंडियन आॅडीट अ‍ॅण्ड अकाऊंट सर्व्हीसमध्ये एक वर्ष काम केले आहे. त्यानी इंग्रजीमध्ये एमएची पदवी घेतली असून पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची पदवीही प्राप्त केली आहे. सध्या त्या पब्लिक अ‍ॅडमिनीस्ट्रेशनमध्ये पीएचडी करीत आहेत. त्या पेण येथे उपविभागीय प्रांताधिकारी असताना त्यांनी बेकायदेशीर बांधकामे व सरकारी, राखीव जागांवरील अतिक्रमणांच्या विरोधात मोहिम उघडून २ हजाराच्यावर अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. (वार्ताहर)