शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा प्रकरणातील दाम्पत्याला पोलीस कोठडी

By admin | Updated: August 24, 2015 02:24 IST

विक्रमगड (आलोंडे) येथील अंधश्रद्धा पसरवून जादूटोणा करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या जोरदार भूमिकेला भक्कम पाठबळ देण्याचे काम लोकमतच्या

हितेन नाईक, पालघरविक्रमगड (आलोंडे) येथील अंधश्रद्धा पसरवून जादूटोणा करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या जोरदार भूमिकेला भक्कम पाठबळ देण्याचे काम लोकमतच्या (१० आॅगस्ट) वृत्ताने केल्यानंतर विक्रमगड पोलिसांनीही जादूटोण्याच्या नावावर गरीब, अशिक्षित आदिवासींची लूट करणाऱ्या शांताबाई व किसन लहांगे या दोन मांत्रिकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या दोघांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आलोंडे (वडपाडा) येथे वाडा तालुक्यातील किसन रामा लहांगे व त्यांची पत्नी शांताबाई यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मंत्रतंत्राद्वारे भूतपिशाचांना आवाहन करून अघोरी कृत्ये करण्यास काही लोकांना भाग पाडल्याचेही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते. प्रेतात्म्याचा वास असल्याची घातली भीतीआलोंडे येथील फिर्यादी संगीता पाचलकर यांना वरील दोन्ही आरोपींनी तुमच्या अंगातील भूत मंत्रतंत्राने काढून देतो, असे सांगितले व त्यांना एक बकरा, कोंबडा व पूजेचे साहित्य आणावयास सांगितले. त्यानंतर, काही दिवसांनी फिर्यादीच्या घरी जाऊन घरामध्ये ५ ते ६ फुटांचा खड्डा खणून येथे प्रेतात्म्याचा वास असल्याने अजून वेगळ्या प्रयोगासाठी दहा हजार रुपयांची मागणी फिर्यादीकडे केल्याचे नंदावळकर यांनी लोकमतला सांगितले.या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने या दोन्ही आरोपींच्या विरोधात पाठपुरावा करणाऱ्या सुरेश कोती, निवृत्ती वेखंडे, झिंपर भवर, जानू शिंगडा, स्वप्नील काटकरी यांच्यासह विक्रमगड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.