शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अर्नाळ्यातील महात्मा गांधी स्मारकाची दुर्दशा

By admin | Updated: May 28, 2017 02:57 IST

अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात.

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. तर साफसफाई होत नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थींचे ८ जानेवारी १९४८ रोजी अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याची आठवण कायम रहावी यासाठी त्याठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले होते. मात्र, त्याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे.मध्यंतरी याठिकाणी चोहोबाजूंनी झाडावेलांनी वेढले होते. त्यावर मिडीयातून आवाज उठवल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यावेळी अनेक पुढारी आणि पक्षांनी स्वच्छता राखण्याच्या वल्गना केल्या होत्या. पण, दोन वर्षांनंतर स्मारक पुन्हा एकदा अपेक्षिताचे जिणे जगू लागले आहे. गांधी जयंतीच्या दिवशी याठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यानंतर मात्र याठिकाणी कुणी फिरकतदेखिल नाही. महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनानंतर या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मारकाचे पावित्र्य जपण्यात यावे. याठिकाणी कायमस्वरुपी रखवालदार नेमण्यात यावा. स्मारक परिसराची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला आहे.