शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या भूकंपाने घसरला शालेय पटसंख्येचा टक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:18 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान । पालकही झाले चिंताग्रस्त

सुरेश काटे तलासरी : तलासरी भागात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या भूकंपामुळे या परिसरातील शाळांमधील पटसंख्येचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी भूकंपग्रस्त शाळांतील वर्ग बाहेर बसत होते. परंतु आता पाऊस आमि चिखल, ओल यामुळे तोही मार्ग बंद झालेला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा जून्या झाल्या असून त्यातल्या बऱ्याच धोकादायक ठरल्या आहेत. अनेक गळक्या आहेत. अशा स्थितीत त्यातच वर्ग भरविले तर भूकंपाचा धक्का बसून मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने भूकंपाची मालिका सुरु झाल्यावर जे तंबू पुरविले. ते वर्ग भरविण्यास उपयुक्त व पुरेसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे तरी कसे? असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. आधीच शिक्षकांच्या कमतरतेमुळे पटसंख्या बरीचशी घसरलेली असते. त्यात आता ही नवी भर पडलेली आहे. यातील बहुसंख्य शाळा या दगड विटांची बांधणी आणि कौलारू छप्पर अशा आहेत. त्यामुळे वर्ग चालू असतांना भूकंपाचा धक्का बसला तर जिवीतहानी घडू शकते.हा उपाय तातडीने करणे गरजेचेजवळपास जिथे कुठे पर्यायी, मजबूत जागा उपलब्ध असेल तिथे हे वर्ग स्थलांतरीत करणे हाच एक इलाज तातडीने करणे आवश्यक आहे. कारण नव्या वर्ग खोल्या तातडीने बांधल्या जाणे शक्य नाही. त्यासाठी पुढाकार घेणार कोण? हा खरा प्रश्न आहे. आमदारांनी आपल्या निधीतून मदत केल्यास ही समस्या सुटू शकते.