शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

जव्हारची लोकसंस्कृती अन् जाती व्यवस्था झाली शब्दबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:09 IST

येथील जव्हार संस्थानाचा उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवादशीलपणे लिखाण केलेले ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ आणि ‘जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.

- हुसेन मेमनजव्हार -  येथील जव्हार संस्थानाचा उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवादशीलपणे लिखाण केलेले ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ आणि ‘जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.संस्थानाची ऐतिहासिक माहिती या तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतीक आणि जव्हारच्या लोकसंस्कृतीचे विविध पैलू मुकणे यांनी उलगडून दाखिवले आहे. त्यांचे प्रकाशन शुक्र वारी गांधी चौक येथील जुन्या नगरपरिषद कार्यलयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ या खंडामध्ये संस्थान कालीन पार्श्वभूमीचे लिखाण केले असून, यामध्ये जव्हार संस्थानातील गड किल्ले, राजवाडे, गडी, इथली वारली कला, आदिवासी नृत्य, तारपा नृत्य, स्त्री-पुरु षांचा एकमेकांच्या कमरेभोवती हातांचा वेटोळे घालून लयबध्द पदन्यास, नृत्य, विविध फुलमाळांच्या वेण्यांनी सजविलेला केशसंभार, संगीत वाद्यांचा व तारप्याचा मद्यधुंद करणारा सवरध्वनी संगीताचा अविष्कार यावर लिखाण केले आहे.जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा या खंडामध्ये तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतिक, आणि जव्हारचा गणपती, ग्रामदेव, शिवमंदिर, जागृतदैवत खंडोबा तसेच राजदरबारी दसरा आणि ढोल नृत्य, तारपा नृत्य, बोहाडा नृत्य, तसेच आदिवासींच्या पोट जाती वारली, कोकणा, क. ठाकूर, म.ठाकूर, कातकरी, ढोरकोळी, महादेव कोळी या विषयांवर विस्ताराने प्रकाशझोत टाकून मार्मिक शब्दात लिखाण केले आहे. प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी लिखाण करण्यासाठी गेली चार वर्ष मुकणे यांनी माहिती गोळा लिखाण केले.या दोन्ही ग्रंथरुपी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ महासंचालक गो. ए. सोसायटीचे संचालक डॉ. म. स. गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, अ‍ॅड. वासुदेव गांगल, जव्हार न. पा. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, संदीप वैद्य, डॉ. प्रा. श्रीनिवास जोशी अन्य मान्यवर, नागरिक सोहळ्यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार