शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेवग्याच्या शेंगांनी दिला संसाराला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:39 IST

मिळतो रोजगार : कुपोषणावर अत्यंत प्रभावी

वाडा : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी तसेच लहान मुलांना लोहयुक्त कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्त्वे मिळावीत, यासाठी शेवग्याच्या शेंगा उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्याचा आहारात समावेश करण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे या शेंगांचा दर दोन महिन्यांपासून प्रती किलो ४० ते ६० रुपये एवढा राहिला आहे. या शेंगांनी येथील आदिवासींच्या संसाराला चांगलाच आधार दिला आहे.कुठल्याही प्रकारची औषधांची मात्रा नसलेल्या शेंगांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. विशेषत: हॉटेलमध्ये सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगांचा अधिक वापर होत असल्याने या शेंगांना वर्षभर मागणी असते. कुपोषित बालकांच्या रोजच्या आहारात शेवगा झाडाची पाने, फुले आणि शेंगा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तर यापासुन लोह तसेच कॅल्शिअम चांगल्याप्रकारे मिळते, आणि ते कुपोषण घालविण्यासाठी गुणकारी ठरते असे सिद्ध झाल्याने या शेंगांना या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. खेड्यापाड्यातून वाडा, कुडूस येथील बाजारपेठेत शेकडो महिला या शेंगा विक्री करतांना दिसतात. या बाजारपेठेत प्रतीदिन ४ ते ५ क्विंटल शेंगांची विक्री होते. येथील महिला खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन शेतकऱ्यांच्या परसदारातील शेवग्याच्या शेंगा विकत घेऊन त्या बाजारात विक्री करतात, त्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.