शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जि. प.साठी ७ जानेवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:47 IST

मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली असून १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.

पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंगळवारी केली.

पालघर जि. प.ची व पंचायत समितीची मुदत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संपुष्टात आली असून जि. प.च्या ५७ गटांसाठी तर पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई अशा ८ तालुक्यातील एकूण ११४ गणाच्या जागेसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची भंबेरी उडाली आहे. संबंधित ठिकाणी मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली असून १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. २२ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी २४ डिसेंबर रोजी होईल. अपील नसल्यास ३० डिसेंबर रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल.

मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी ही निवडणूक होत असून २९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील ५७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.अशी असेल सदस्य संख्यातलासरी व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ५ तर पंचायत समिती सदस्य १०, जव्हार आणि वसई तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ४ तर ८ पंचायत समिती सदस्य, डहाणू तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य १३ तर पंचायत समिती सदस्य २६, वाडा तालुक्यात ६ जिल्हा परिषद सदस्य तर १२ पंचायत समिती सदस्य, पालघरमध्ये सर्वाधिक १७ जिल्हा परिषद सदस्य तर ३४ पंचायत समिती सदस्य तर मोखाडा ३ जिल्हा परिषद सदस्य तर ६ पंचायत समिती सदस्य असणार आहेत.