शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात तणाव

By admin | Updated: November 4, 2015 00:25 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील १३४ लिपीक टंकलेखक पदाच्या परिक्षेचा पेपर दोन वेळा फुटल्याने या परिक्षा रद्द करून या प्रकरणाची सीआयडी, सीबीआय चौकशी

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील १३४ लिपीक टंकलेखक पदाच्या परिक्षेचा पेपर दोन वेळा फुटल्याने या परिक्षा रद्द करून या प्रकरणाची सीआयडी, सीबीआय चौकशी करावी व यातील दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या कॉपीप्रकरणामुळे वातावरण चिघळले असतांना उत्तीर्ण झालेले बहुतांशी परजिल्ह्यातील उमेदवार उद्या बुधवारी कागदपत्रासह उपस्थित राहणार असल्याने स्थानिक तरूणामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत असून वातावरण तणावपूर्ण होत आहे.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक टंकलेखक पदाच्या १३४ जागासाठी ४ आॅक्टोबर रोजी झालेल्या परिक्षेमध्ये मोबाईलद्वारे उत्तराची देवाणघेवाण झाल्याने ही परिक्षा रद्द करून पुन्हा नव्याने १८ आॅक्टोबर रोजी परिक्षा घेण्यास आली होती. यावेळीही परिक्षा केंद्रात मोबाईलचा वापर झाल्याने पुन्हा जालना येथील दोन परिक्षार्थींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या परिक्षेमध्ये परजिल्ह्णातून आलेल्या परिक्षार्थीेंकडून मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार घडल्याची शक्यता पाहता ही परिक्षा रद्द करावी या मागणीसाठी सिद्धार्थ सांबरे, अमोल सांबरे, सचिन भोईर हे स्थानिक तरूण आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत.पालघर जिल्हा घोषीत झाल्यानंतर नोकरी भरती मध्ये स्थानिक तरूणांना प्राधान्याने नोकरीत सामावुन घेतले जाईल असे सांगितले जात असताना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पैकी १३४ जागासाठी प्रथमत: बुधवारी आपल्या सर्टीफिकेटवर व इतर कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या २६६ विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी उत्तीर्ण हे परजिल्ह्णातील असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या पेपरफुटीप्रकरणातून परराज्यातील विद्यार्थ्यांना लाखो रू. घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परिक्षा अगोदर पुरविण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. - उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जे उमेदवार उत्तीर्ण झालेत अशा २६६ परिक्षार्थींना परिक्षार्थींना प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशावेळी स्थानिक उमेदवार परिक्षार्थींच्या न्याय हक्कासाठी वाडा येथील तरूण साखळी उपोषणाला बसले असताना उद्याच सकाळी १० वा. हे उत्तीर्ण परजिल्ह्णातील परिक्षार्थीही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होणार असल्याने स्थानिक तरूणामधून संतप्त भावना उमटत आहेत.