शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर तालुक्यातील २१ पेसा गावे घोषित

By admin | Updated: April 20, 2017 23:57 IST

जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील प्रस्तावित गावांपैकी २१ गावे पेसा गावे घोषित करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबतची घोषणा केली आहे

पालघर/नंडोरे : जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील प्रस्तावित गावांपैकी २१ गावे पेसा गावे घोषित करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे या गावांना आता आर्थिक स्वायत्तता मोठ्या प्रमाणावर प्राप्त होणार आहे. या गावांमध्ये बेटेगाव ग्रामपंचायतीतले आंबागांव, बोरशेती ग्रां.प.तील अलनशेती व वनशेती, चहाडे ग्रां.पं. तील कासपाडा, लहांगेपाडा व आनंदगाव, दिहसर तर्फे तारापूर मधील भेंडवल व जांभळे, गिरनोलीतील खुताडपाडा व वळवीपाडा, गुदले तील पांजरा, घिवली तील टोकपाडा, कमारेतील आंबेगाव, काटाळेतील कोल्हेमानपाडा, कोकणेरमधील राईगाव, कोंढणमधील डोंगरमाळ, मान ग्रां .पं तील नूतनगाव, संघमेव व पालेगाव रावते ग्रां .पं तील नांदगाव, सागावेतील ब्राह्मणपाडा तर उनभाट ग्रामपंचायतीतील चिरेपाडा यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आदिवासी विकासाला चालना मिळावी तसेच त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट होण्यासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या या गावांना आता स्वतंत्र ग्रामसभा घेणे शक्य होणास असून स्वत:चा ग्रामसभा कोष, गावांतर्गत लघु पाणी साठ्याचे नियोजन, गावातील गौण खनिजाचे नियोजन, गावातील अनुसूचित जमातीच्या अतिक्रमण झालेल्या जमिनी परत मिळवून देणे या सारखे अधिकार थेट या गावांना या अंतर्गत मिळालेले आहेत. या निर्णयामुळे या गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा विकासही जलद होणार आहे. (वार्ताहर)