शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:28 IST

संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलास

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/वसई : संपूर्ण जिल्ह्याला गेले चोवीस तास पावसाने झोडपून काढले त्याचा मोठा फटका वसई, विरार, डहाणू या परीसराला बसला. त्यामानाने वाडा, जऱ्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, बोईसर या परीसराची स्थिती बरी होती. या मुसळधार पावसाचे पाणी मुंबई, अहमदाबाद मार्गावर साचून प्रदीर्घ काळ भीषण वाहतूककोंडी झाली. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई या शहरांसह ग्रामीण भागात व नवघर एसटी स्टँडवर पाणी तुंबले होते. पापडी-बंगली रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुुरु झाली. गेले अनेक दिवस गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा झोडपून काढले. पावसाच्या तडाख्याने वसईतील सखल भागात पाणी तुंबले होते. विरार पश्चिमेला विवा कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. नालासोपारा सेंट्र्ल पार्क रस्ता पाण्याखाली गेला होता. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते.मुंबई अहमदाबाद हायवेवर ससूपाडा नजिक हायवेवर दोन्ही दिशेला पाणी तुंबले होते. तर पाण्याच्या प्रवाहालाही प्रचंड वेग होता. त्यामुळे हायवेवरील वाहतूक धिम्या गतीने जात होती. दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली होती. गेल्याच आठवड्यात वसई वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी हायवेवर याठिकाणी पाणी साचून रहात असल्याने फुटलेला जुना पाईप बदलून नवीन पाईप टाकून घेतला होता. त्यानंतरही पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरातून पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची सोय नाही. रस्त्यापलिकडे पूर्वी पावसाचे पाणी साचून राहण्यासाठी मोकळी जागा होती. पण, त्याठिकाणी आता मातीचे मोठे भराव झाल्याने पावसाळी पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. बारा गावांचा संपर्क तुटलातानसा नदीला आलेल्या पूरामुळे भाताणे-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई तालुक्यातील बारा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने तानसा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पूलापलिकडील भाताणे, नवसई, थळ््याचा पाडा, आडणे, जांभुळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या बारा गावांचा संपर्क तुटला आहे. या बारा गावातील गावकऱ्यांना दूरवरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे एस.टी. आणि काळी-पिवळी याद्वारे होणारी वाहतूक थांबली आहे. त्याचा फटका चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बसला आहे.