शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याचा निकाल ९३.५७ टक्के

By admin | Updated: June 14, 2017 02:50 IST

पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार

- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार ८३ विद्यार्थी तर २१ हजार २५ विद्यार्थिनी असे एकूण ४५ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.५७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी निकालात विद्यार्थ्यांवर निसटती बाजी मारली आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५० हजार ५१६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी आपले अर्ज भरले होते.मात्र प्रत्यक्षात २७ हजार ३२ विद्यार्थी तर २३ हजार ३११ विद्यार्थिनी अश्या एकूण ५० हजार ३४३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. १७३ विद्यार्थी अनुपस्थित होते.वाडा तालुक्यात ३२ शाळा मधून १ हजार ८०१ विद्यार्थी तर १ हजार ५०० विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ५६२ विद्यार्थी तर १ हजार ३३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा एकूण निकाल ८७.६७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी बाजी मारली.मोखाडा तालुक्यातील १८ शाळा मधून ७३८ विद्यार्थी तर ५८७ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या अशा एकूण १ हजार ३२५ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्यातून ५४७ विद्यार्थी तर ४४० विद्यार्थी असे एकुण ९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ७४.४९ टक्के इतका लागला असून विद्याथीनींनी तालुक्यात बाजी मारली आहे.विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ३७४ विद्यार्थी तर १ हजार २३७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार २२७ विद्यार्थी तर १ हजार ७५ विद्यार्थ्यांनी असे एकूण २ हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८८.१७ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.जव्हार तालुक्यातील २५ शाळांमधून १ हजार ९० विद्यार्थी तर १ हजार १७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ९७८ विद्यार्थी तर ८४४ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८६.४७ टक्के लागला असून या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.तलासरी तालुक्यातील ३१ शाळांमधून १ हजार ७३३ विद्यार्थी तर १ हजार ४६४ विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ३११ विद्यार्थी तर १ हजार १३० विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ७६.३५ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.डहाणू तालुक्यातील ४८ शाळांमधून २ हजार ७६१ विद्यार्थी तर २ हजार ३७९ विद्यार्थिनी असे एकूण ५ हजार १४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी २ हजार ३५९ विद्यार्थी तर २ हजार ३१ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८५.४१ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.पालघर तालुक्यातील ८१ शाळांमधून ३ हजार ९९२ विद्यार्थी तर ३ हजार ४७८ विद्यार्थिनी असे एकूण ७ हजार ४७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३ हजार ५५८ विद्यार्थी तर ३ हजार १४१ विद्यार्थिनी असे एकूण ६ हजार ६९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८९.६८ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.वसई तालुक्यात सर्वाधिक २४० शाळांमधून १३ हजार ५४३ विद्यार्थी तर ११ हजार ६४९ विद्यार्थिनी असे एकूण २५ हजार १९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १२ हजार ५४१ विद्यार्थी तर ११ हजार ३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.