शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही अनेक गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 04:15 IST

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

- रवींंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यासह अनेक भागांत फेब्रुवारीच्या मध्यान्हीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असताना धामणी, शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -१, दापटी-२, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंडाचीवाडी ठाकुरपाडा पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा २४ पाड्यासह एकूण ३१ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.गेल्या वर्षी जवळपास याच कालावधीमध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती व नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गावपाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यंत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना, पण तालुक्यात पाणीटंचाईने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने पाणीटंचाई समस्या कठीण होऊन बसणार आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठमोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणावर करोडोचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासीना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले आहेत.दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील पाणीटंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु लगतच्या गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते.पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला, याचे उत्तर आजही प्रशासणाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, बंधारे, नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च झाला आहे.मोखाडा तालुका हा टंचाईग्रस्त तालुका असून दरवर्षीच टंचाईग्रस्त गावपाड्यांचा शंभरचा आकडा पार करावा लागतो. टँकरच्या नावाखाली दरवर्षी करोडोचा खर्च देखील होतो. यामुळे मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज आहे. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :palgharपालघर