शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करत ‘त्याने’ निर्माण केले स्वत:चे विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:19 IST

जन्मत: व्यंग हा माणसाचा कमकुवतपणा ठरत नाही.

पारोळ : जन्मत: व्यंग हा माणसाचा कमकुवतपणा ठरत नाही. उलट आपल्या जिद्द, मेहनतीच्या जोरावर कुणाकडे दयेची भीक न मागता आपले विश्व उभे करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विरारचा मोहनसिंग तो आज खरा बाहुबली आहे.अपंग व्यक्ती म्हटली की अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र विरार येथील २५ वर्षीय मोहनसिंग ठाकूर याने अपंगात्वावर विजय मिळवत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. आयुष्यातील विविध संकटांचा सामना करत स्वाभिमानाने आयुष्य जगणाऱ्या मोहनची जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे.देवाने जन्मत:च शारीरिक व्यंग दिले. मात्र खचून न जाता जगण्यासाठी धडपड करणारा मोहनसिंग हा सध्या दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तो एका हाताने खोल विहिरीत पोहतो, एका हाताने उंच नारळाच्या झाडावरही चढतो, नारळही एका मिनिटात सोलतो. इतकेच नव्हे तर वजनदार बुलेटही लिलया चालवतो.जन्मताच मोहनसिंग याचा एक हात अधू आहे. मात्र आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता त्याने आपल्या उपजीविकेचा मार्ग स्वत:च शोधून काढला आहे.मोहनसिंगचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो एका तबेला मालकाकडे काम करतो. त्याचे लग्नही झाले असून त्याला दोन मुले आहेत.>मोहनसिंगला मराठी, हिंदी, तोडकी मोडकी इंग्रजी, भोजपुरी, गुजराती , मल्याळम या भाषेत तो कोणाशीही संवाद साधू शकतो. धडधाकट माणसेही कामधंदा न करता भीक मागतात, मात्र मोहनसिंग कुणावरही अवलंबून नाही.