शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गतवर्षीच्या पुरामुळे आमचे बालपण हरवले; सहाय्यक आयुक्तांना चिमुरडयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:46 IST

दरम्यान चूळणे येथील शिक्षिका मॉनिका कोलासो आयोजित मुलांच्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यालयाला आपल्या परिसरातील बाळ गोपांळाची मोठी समस्या कोणती व ती सोडविण्यासाठी कोणाकडे भेट देणे आवश्यक आहे.

आशिष राणे वसई : महापालिकेच्या नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग अंतर्गत शहरी व साधारण ग्रामीण भाग असलेल्या चुळणे गाव व भाबोळा परिसरातील शेजोळच्या बाळ- गोपाळांनी गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे गावात आलेले पुराचे पाणी आणि त्यामुळे झालेले अतोनात हाल ऐकवण्यासाठी थेट महापालिकेत पोहचून मोठे नागरिक असो वा राजकारणी तर स्वत: दस्तुरखुद्द स्थानिक नगसेवकांलाही लाजवेल असा ‘दे धक्काच’ दिला आहे .गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील शाळा, घरं, समाज मंदिर मुळातच संपूर्ण गाव हा दहा ते बारा दिवस पाण्याखाली व अंधारमय होता आणि यंदा पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये याकरता त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी येथील चुळणे गावातील १७ विद्याथ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी थेट महापालिकेच्या नवघर माणिकपूरचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोनसालवीस यांच्या दालनात पोहचून त्यांना त्यांच्या समस्यांचे एक निवेदन देऊ केले असल्याची माहिती थॉमस डाबरे यांनी लोकमत ला दिली आहे.

दरम्यान चूळणे येथील शिक्षिका मॉनिका कोलासो आयोजित मुलांच्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यालयाला आपल्या परिसरातील बाळ गोपांळाची मोठी समस्या कोणती व ती सोडविण्यासाठी कोणाकडे भेट देणे आवश्यक आहे. या निमित्ताने दि.२१ मे मंगळवारी या १७ बाळ -गोपाळांनी नवघर माणिकपूर शहर एच प्रभाग समिती कार्यालयाचे सहा. आयुक्त गिलसन घोन्सालविस यांची भेट घेतली व गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत यावर सविस्तर चर्चा केली. एकूणच आपल्या गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि त्यांची सोडवणूक स्थानिक प्रशासन म्हणून कशा प्रकारे करते याउलट त्यात आपली जबाबदारी काय असली पाहिजे याची नेमकी माहिती मुलांनाही होणे गरजेचे असल्याचे सांगत मुलांना त्यांच्या विद्यार्थी दशेच्या काळात यांचे आकलन व जाणीव होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती.त्यानुसार चुळणे गावातील सामाजिक कार्यकर्ते थॉमस डाबरे व शिक्षिका लुबिना घोन्सालविस या दोघांच्या सहकार्याने ही भेट घडवून आणली होती. यावेळी झालेल्या तासाभराच्या भेटीत सर्व मुलांनी सहाय्यक आयुक्तांना चूळणे व भाबोळा परिसरात गेल्या वर्षी पुराच्या पाण्यामुळे आलेले आपले गंभीर अनुभव कथन केले.काय म्हटले आहे मुलांनी निवेदनातआम्ही पावसाचा आनंद घेऊ शकत नाही. शाळेत जाऊ शकत नाही, कारण शाळेतही पाणी साचते. व्यवस्थित खेळू , बागडू शकत नाही. कुठे जाऊ शकत नाही. तसेच प्रामुख्याने हे पाणी गटार व घाणीचे असल्याने त्यामध्ये जीव जंतू असू शकतात अणि ते आरोग्यास अपायकारक आहे. गावातील नालेसफाई, गटारे ,कचरा यांची नीट सफाई होऊन गाव स्वच्छ ठेवावा यासाठी अधिकारी म्हणून जातीने लक्ष घालावे .

वास्तविक निवेदन, चर्चा, उपाय भेटी ही सर्व कामे लोकप्रतिनिधी व मोठ्यांची, नागरिकांची मात्र यंदा प्रथमच असे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले, वास्तविक आपली तरूण पिढी सरकारी दफ्तरी पाय टाकायला तयार नसते पण आज चक्क वसई विरार महापालिकेत विद्यार्थी दशेत असलेल्या या बाळगोपाळांनी महापालिका इमारतीत आनंदाने इकडे तिकडे हिंडून कामकाज समजावून घेतले आणि त्यावेळी बच्चे कंपनीला पहिल्यादांच कार्यालयात पाहून येथील कर्मचारी सुध्दा खुश तर झाल्याचे दिसले. मात्र दुसरीकडे हा क्षण सर्वानाच लाजवेल असा होता.