शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

वाढवणला सेनेचा विरोध

By admin | Updated: August 18, 2015 00:26 IST

जिल्ह्यातील नांदगाव येथे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने प्रस्तावित जेटी तयार करण्याचे ठरविले असून या जिंदाल जेटीमुळे येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा

पालघर : जिल्ह्यातील नांदगाव येथे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने प्रस्तावित जेटी तयार करण्याचे ठरविले असून या जिंदाल जेटीमुळे येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिंदाल जेटी आणि वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही, असा ुइशारा शिवसेना उपनेते व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी येथे दिला. जिंदाल जेटीची पाहणी करण्याकरिता ते येथे आले होते. ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नांदगाव येथील मच्छीमारांचे शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी मला नांदगाव येथे जाऊन जिंदाल जेटीची पाहणी करण्यास सांगितले. पालघर किनारपट्टीवरील कोळी, आगरी, भंडारी, कुणबी, आदिवासी अशा बहुसंख्य बांधवांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. पालघरची किनारपट्टी ही मासेमारीचा उत्तम झोन आहे. जिंदाल जेटीमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. तसेच मासेमारीबरोबर किनारपट्टीवर असलेली भातशेती, नारळ, ताडाची बागायती, निसर्गाचे अतिशय नयनरम्य सौंदर्यसुद्धा नष्ट होणार आहे. शिवसेना कायम स्थानिक बांधवांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तशीच आज व यापुढेदेखील उभी राहील. युतीचे सरकार असतांनाही शिवसेनेने वाढवण बंदराला १९९८ साली जसा प्रखर विरोध केला, तसाच विरोध जिंदाल जेटी व वाढवण बंदराला राहील. स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे कोणते प्रकल्प येत असतील तर शिवसेना ते कदापि होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.नांदगाव येथे जेटीची पाहणी करताना पालघर सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, पालघर उपजिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील, नीलम संखे, शिवसेना पदाधिकारी जगदीश धोडी, नांदगाव येथील विभागप्रमुख निलेश पाटील, धर्मंेद्र पाटील, राजू वाडकर, जगदीश ठाकूर, विशाल पाटील, मनीषा पिंपळे, जितेंद्र मेहेर, कल्पेश पिंपळे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)