शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांना विरोध: पत्नीने केला पतीचा खून

By admin | Updated: July 24, 2015 03:34 IST

पालघरमधील शिक्षक समीर हरेश्वर पिंपळे हे त्यांची पत्नी व तिचा मित्र संतोष संखे यांच्यामधील विवाहबाह्य संबंधांच्या आड येत असल्याने

पालघर : पालघरमधील शिक्षक समीर हरेश्वर पिंपळे हे त्यांची पत्नी व तिचा मित्र संतोष संखे यांच्यामधील विवाहबाह्य संबंधांच्या आड येत असल्याने त्या दोघांनी संगनमत करून समीरची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पालघर पोलीसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.पालघरच्या देलवाडी हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले समीर व दातिवरे शिक्षिका पत्नी समीधा आणि सात वर्षाच्या मुलाबरोबर राहत होते. समीधाचे पालघर येथील टुरीस्टचा व्यवसाय करणाऱ्या संतोष यादव संखे यांच्याशी संबंध असल्याचे समीरला कळल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडत असत. ९ जुलै रोजी त्यांच्या फ्लॅटमधील बाथरूममध्ये समीर मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे त्याच्या पत्नीकडून भासवले जात होते. पालघर पोलीसांनीही याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु मुलाच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा तसेच तोंडातून रक्त येत असल्याने आपल्या मुलाचा खुन करण्यात आल्याची तक्रार समीरचे वडील हरेश्वर पिंपळे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली होती. याबाबत लोकमतमध्ये २० जुलैला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवून समीधा आणि तिचा प्रियकर संतोष यांनी संगनमत करून समीर झोपलेला असताना उशीने तोंड दाबून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पालघरचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक बी. जी. यशोद यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समीधाने गुन्ह्णाची कबुली दिल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)