शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घोलवड पुलानजीक टाकल्या इंजेक्शनच्या निडल्स उघडयावर

By admin | Updated: February 15, 2017 23:31 IST

डहाणू-बोर्डी मार्गाच्या दुतर्फा राख, प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ टाकण्याचे प्रकार वाढले असतांनाच आता घोलवड पूलालगत इंजेक्शनच्या

अनिरुद्ध पाटील / बोर्डीडहाणू-बोर्डी मार्गाच्या दुतर्फा राख, प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ टाकण्याचे प्रकार वाढले असतांनाच आता घोलवड पूलालगत इंजेक्शनच्या निडल, काचेच्या बाटल्यांचे तुकडे व इतर कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे वाटसरु आणि प्राण्यांना इजा पोहचण्यासह स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागल्याने दोषींवर कारवाईची मागणी घोलवड ग्रामस्थांनी केली आहे. डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग अवैध व अवजड वाहतुकीमुळे धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नरपड, चिखले आणि घोलवड या गावच्या हद्दीत ठिकठिकाणी प्लास्टीक कचरा, कुजके अन्न पदार्थ उघड्यावर टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधीसह परिसराला बकाळ स्वरूप आले आहे. रविवारी घोलवड पूलानजीक एका वाहनातून माती व कचरा उघड्यावर टाकण्याचा प्रकार समोर आला. त्यामध्ये इंजेक्शनच्या निडल, फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे व इतर सामुग्री आहे. या मार्गावरून मरवाड आणि टोकेपाडा भागातील विद्यार्थी, महिला, चाकरमानी आणि सकाळ-संध्याकाळ चालण्याचा व्यायामाला येणाऱ्यांची वर्दळ असते. गरिबीमुळे स्थानिक अनवाणी प्रवास करीत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनास्थळानजीकचे कांदळवन वस्तीपासून लांब असल्याने येथे नेहमी अज्ञाताकडून कचरा टाकून पेटवला जातो. त्यामुळे जैव विविधतेला धोका पोहचतो. कांदळवनाच्या संरक्षणाची जबाबदारी बोर्डी वन परिक्षेत्र आणि महसूल विभागाची असतांना दुर्लक्ष केले जाते. तर घोलवड ग्रामपंचायतीकडून स्वच्छ भारत सक्षमपणे राबवली जात नसल्याचे दिसून येते आहे. दरम्यान आरोग्य विभागाशी संबंधीत साहित्य वापरानंतर उघड्यावर टाकल्याने सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे. हा विषय केवळ ग्रामपंचायतीशी निगडीत नसून पालघर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देणे आवश्यक आहे.