शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील फक्त १३७८ मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:39 IST

रोहयोचे धोरण नापास : पाच हजारांपेक्षा जास्त मजूर कुटुंबांची नोंद; शासनाचे धोरण आदिवासींची कुचंबणा करणारे

संजय नेवे विक्रमगड : ग्रामिण व आदिवासी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार हमीच्या योजना सुरु असल्या तरी प्रत्यक्ष रोजगार फक्त १३७८ मजुरांना मिळाला आहे. नोंदणी पाच हजारापेक्षा जास्त मजूर कुटुंबाचीं असताना रोजगाराची उपलब्धता फारच तोकडी असल्यामुळे ‘मागेल त्याला काम अन् पंधरा दिवसात दाम’ या ब्रिदवाक्याला हरताळ फासला जात आहे.

तालुक्यात रोजगार हमीची २१९ कामे सुरू तर फक्त २१३२ मजूरांना यंदा रोजगार मिळाला आहे. महात्मा गाधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाडयासह मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.शंभर दिवस पुरेल एवढे प्रत्येकाला मिळेल हा उद्देश असला तरी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत पैकी सवादे, कासा, साखरे, दादडे, वेढेचरी, बोराडे, खडकी, जाभे, वेहलपाडा, आलोंडा, बाधन केगवा आदी ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाची व शोषखड्ड्यांची एकुण १३९ कामे सुरू आहेत. मात्र, इतर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराचे स्थलांतर सुुरु आहे.या घरकुलाच्या कामामुळे फक्त ७५४ मजूरांना काम मिळाले आहेत. शेतीची कामे संपली आहेत व रोजगाराच्या शोधात मजूर शहराकडे वळला आहे. रोहयोची कामे वेळेत सुरु झाली तरच मजूरांचे स्थालातर होणार नाही . तसेच, रोजगार हमीची कामे देखील होतील. मात्र धोरणात्मक त्रुटीमुळे किंवा प्रशासकीय अम्मलबजावणीतील दोषांमुळे रोजगार हमी नावालाच दिसत आहे. स्थलांतरामुळे कुपोषण तसेच अशिक्षितपणा वाढत आहे. नवीन अध्यादेश प्रमाणे २५ ते २६ कामे नविन सुरू करता येतील असे असताना मात्र त्याची अजून कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.

तालुक्यात फक्त २१३२ मजूरांना प्रत्यक्ष काम मिळाले आहे अजून रोजगार मिळाला नसल्याने बाकीच्या मजुरांनी काय करायचे असा सवाल मजूरानी केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थंलातर होत असून हे रोखण्यासाठी या रोजगाराचे नियोजन करून रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या यंत्रणेवर आहे. पंरतु यंत्रणाच हात झकटण्याचे काम करीत असल्याचा आरोप तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातून होत आहे. या घरकुलाच्या कामामुळे फक्त ७५४ मजूरांना काम मिळाले आहेत. काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराचे स्थलांतर सुुरु आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार