शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीवर ब्लेडने वार

By admin | Updated: November 3, 2015 01:02 IST

माहिमच्या भुवनेश किर्तने विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमामधून शाळेसमोरच तरूणाने ब्लेडने वार करून जखमी केले.

पालघर : माहिमच्या भुवनेश किर्तने विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमामधून शाळेसमोरच तरूणाने ब्लेडने वार करून जखमी केले. तिला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सातपाटी सागरी पोलीसांनी अज्ञात तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वडराईच्या (रावलेपाडा) येथील मंजिरी (नाव बदललेले) ही माहीम येथे शिकते. काही दिवसापासून एक तरूण तिच्या मागावर असल्याचे तिच्या लक्षात आले. रविवारी या तरूणाने मंजिरी घरी असताना तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून आपण घरी येत असल्याचा निरोप दिला. त्यामुळे घाबरून मंजीरीने दरवाजा बंद करून घेतला. त्या तरूणाने दरवाजा ठोठावून तिला दार उघडण्यास सांगितले. मात्र, तिने मोबाईलवरून मामाला फोन करून ही गोष्ट सांगितल्याने तो तरूण निघून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या मंजिरीच्या आईने तिला आणि तिच्या धाकट्या भावाला नंडोरे येथे राहणाऱ्या आपल्या आईकडे (आजीकडे) पाठविले. मात्र त्या रिक्षाचा त्या तरुणाने पाठलाग केला. सोमवारी परीक्षा संपताचबाहेर आलेल्या मंजिरीला त्या तरूणाने गाठले. या दोघांमधील संभाषणानंतर तरूणाने हातातील ब्लेडने मंजीरीच्या डाव्या हातावर ब्लेड मारून तीची नस कापण्याचा प्रयत्न केला. तिने प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत शाळेत धावत जात शिक्षीकेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या नातेवाईकांनी तीला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.