शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ओमकार अ‍ॅकॅडमीचे तिघे स्पर्धा परीक्षेत यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:55 IST

माझ्या जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर ह्याच मातीतून जन्मलेला व समस्यांची जाणीव असलेला एखादा विद्यार्थी आयएएस,

पालघर : माझ्या जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर ह्याच मातीतून जन्मलेला व समस्यांची जाणीव असलेला एखादा विद्यार्थी आयएएस, किंवा आयपीएस अधिकारी बनला पाहिजे. हे निलेश सांबरे यांचे स्वप्न खºया अर्थाने सत्यात उतरविण्यासाठी धडपडणाºया झडपोलीच्या ओमकार अकॅडमीचा हितेश दिगंबर गोतारणे या विद्यार्थ्यांसह अन्य दोन विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी २०१७ ची प्रिलिम उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.जन्मत:च हुशार असणाºया व प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांना नेहमीच अनेक खडतर प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. नेमकी हिच खरी गरज ओळखून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विक्र मगड या तालुक्यातील झडपोली येथील आपल्या घरा शेजारीच ओमकार एमपीएससी, यूपीएससी अ‍ॅकॅडमीची भव्य अशी इमारत उभी केली. तीमध्ये क्लासरूम, अभ्यासक्रमासाठी सर्व पुस्तकानी युक्त अशी लायब्ररी राहण्याची, जेवणाची सोय या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध केल्या आहेत. प्रथम जिल्हातील मोजक्याच ६० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या शिक्षणासाठी पुण्यातील तज्ज्ञांची निवड केल्याचे सांबरे ह्यांनी लोकमतला सांगितले. त्यापैकी प्रथम ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून हुशार, होतकरू अशा विद्यार्थ्यांनी या अ‍ॅकॅडमीत अभ्यास केल्यानंतर हितेश गोतारणे हा विद्यार्थी यूपीएससी-१७ च्या प्रिलिम परीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेला आहे. तर वाडा येथून दिलीप नेहरकर, दुर्वेश जाधव (मेट), निखिल पाटील हा विद्यार्थी एमपीएससी प्रीलियम परीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. तसेच तलासरी येथील वाचनालयाचा लाभ घेऊन कृष्णा मारु ती फडतडे हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत. दुर्वेश जाधव-(मेट), निखिल पाटील-हमरापुर, हे विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झाल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी दिली.