शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कोरममुळे ओंदे ग्रामसभा झाली तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:46 IST

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेण्यात येते. याच निमित्ताने ओंदे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २८

तलवाडा : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेण्यात येते. याच निमित्ताने ओंदे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यास जवळपास ३५०० ग्रामस्थांनी नाराजी दाखवत अनुपिस्थती दाखवली. फक्त ४९ ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित असल्याने ग्रामसभेचा उपस्थिती कोरम पुर्ण न झाल्याने ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच चंद्रकला खुताडे यांच्या परवानगीणे ग्रामसेविका वंदना प्रसाद यांनी ही ग्रामसभा ग्रामस्थांच्या कमी व कॉरम पूर्ण न झाल्याने तहकूब करण्यात येते असे घोषित केले.ग्रामसभा तहकूब करण्याची कारणे लक्षात घेता काही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामसभेला घेतलेले ठराव फक्त कागदावरच राबवले जातात. ५ टक्के पेसा निधी, १४ वित्त निधीतून झालेल्या कामांची माहिती व झालेला खर्च ग्रामस्थांना ग्रामसभेत दिली जात नाही. ग्रामस्थ माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रस्त्यावर एलइडी दिवे निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आले हे दिवे १५ ते ३० दिवसातच बंद पडल्याने ग्रामपंचायतीने केलेला खर्च वाया गेला आहे. याची तक्र ार करूनही ग्रापंचायतीने कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत.खांड गावातील पाणी पुरवठा करणारी लहान नळ योजना निकृष्ट दर्जाची आहे. जनाठेपाड्यामध्ये नळ योजने करीता ३८ लाख खर्च करूनही पाणी टंचाई भिडसावत आहे. असा विकास कामा बद्ल अनेक तक्रारी करूनही ग्रामपंचायत विभाग दुर्लक्ष करते. या सर्व परिस्थिती बद्दल ग्रामस्थ नाराज असल्याने ग्रामस्थांनी या ग्रामसभेला अनुपस्थिती दाखवीत नाराजी व्यक्त केली असल्याचे चित्र समोर आले आहे.