शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

२६ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे, अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:16 IST

वसई-नालासोपारा-विरार शहरांत आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री खुलेआम केली जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे.

मंगेश कराळे नालासोपारा : वसई-नालासोपारा-विरार शहरांत आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री खुलेआम केली जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे. पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या २६ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. या आधीही ५१ पाणी विक्रेत्यांवर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.साथीच्या विविध आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्केहून अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी खरेदी करतात. मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे, याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याची विक्री करणाºया अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत. विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रु पयांची मलई लाटत आहेत. वसई-विरार महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभाग समितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजीवी शास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, ठाणे यांच्यामार्फत तपासले गेले असता, सदरचे पाणी हे पिण्यास अपायकारक असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहेत. ‘ब’ प्रभाग समितीमध्ये पाणी विक्र ी करणाºया कंपन्यांचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे या तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी या बोगस कंपन्यांनी महानगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्र ी करण्याचा व्यवसाय चालूच ठेवला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या केवळ एका प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्या आहेत, तर इतर प्रभागात काय अवस्था असेल, असा सवालही सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.>गुन्हे दाखल झालेले पाणी विक्री व्यावसायिकसुनील ब्राह्मणे, कुमार वझे, अलीम खान, अन्वर हुसेन, वामन सुरासे, अब्दुल खान, अबूसामा खान, बसंतलाल यादव, मनोज सिंग, समिम शेख, संजय प्रजापती, लालधारी यादव, अली खान, बबलू भाई, बबू सिंग, रमाशंकर पांडे, नईम शेख, उग्रसेन पाठक, ऐहसान शेख, राजेंद्र कुमार, संजय गुप्ता, शेहनाज शेख, अख्तर शेख, गड्डू सिंग, राकेश सिंग, सुभाष सिंग.>२८ फेब्रुवारी २०२० च्या पूर्वी व आजपर्यंत नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरात २६ पाणी विक्र ी करणारे व्यावसायिक हे पिण्यास अयोग्य पाणी सदर भागातील नागरिकांना विक्र ी करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन आजार होण्याचा संभव असल्याचे माहीत असतानाही ते दूषित पाण्याची विक्र ी करत असल्याने तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.- मनोहर यशवंत केदारे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वसई-विरार शहर महानगरपालिका>महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाºयाने रीतसर तक्र ार दिल्यावर २६ पाणी विक्र ेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करून पुढील चौकशी करत आहे. - विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे