शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांसमोरील मोकळ्या जागेसह रस्त्यांवरही कब्जा; जव्हारमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:34 IST

शहरातील शेकडो अतिक्रमणे केली जमीनदोस्त

जव्हार : जव्हार नगर परिषदेने सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू केली असून, प्रथम नेहरू चौकपासून, गांधी चौक, अंबिका चौक, मांगेलवाडा, एसटी स्टँड रोड आदी ठिकाणी अतिक्रमण पथक, पोलीस सुरक्षा, जेसीबी आणि इतर अतिक्रमण मोहिमेकरिता लागणारी सर्वच साधने सोबत घेऊन धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

शहरातील पक्के गाळे व त्यासमोरील पत्र्याची शेड व गाळ्यासमोरील ओटा असे बांधकाम प्रथम जमीनदोस्त करण्यात आले. रस्त्यालगत असलेल्या छोट्या-मोठ्या पत्र्याच्या टपरीसुद्धा या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. याबाबत नगर परिषदेने दुकानधारकांना दोन महिन्यांपूर्वी प्राथमिक नोटीस बजावली होती, मात्र अचानक सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून कारवाई सुरू केली. प्रथम कारवाई केलेल्या दुकानांचे छप्पर व काही सामान थेट जेसीबीने तोडून टाकले. काही ठिकाणी रविवारी सायंकाळी नगर परिषदेने अतिक्रमणे तोडण्यासाठी सफेद पावडरची खूण केली होती. कारवाईबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. 

शहरातील बहुतेक दुकानदारांनी आपल्या वाणिज्य गाळ्यासमोर ओटा बांधून पुढील जागेत गाळा तयार करून पुढे शटर लावून अतिक्रमण केलेले होते. नगर परिषदेने दिलेली परवानगी झुगारून गाळेधारकांनी आपले गाळे बेकायदेशीर वाढविले आहेत. त्यातही काही जणांनी तर वाढीव गाळाच्या पुढेही रस्त्यावरही आपले सामान अंथरूण अतिक्रमणाचा कळस केला होता. त्यामुळे नेहमी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. पूर्वी गाळ्यासमोरील खुल्या जागेत सामान ठेवण्याकडे नगर परिषद कानाडोळा करीत होती, मात्र  खुली जागा व त्यापुढेही रस्त्यावर थाट मांडून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळेच संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.