शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचे चटके आता रुग्णांनाही

By admin | Updated: August 24, 2015 23:14 IST

अतिदुर्गम आदिवासी भागातील बाजारपेठ असलेल्या मनोर येथे खाजगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपली फी तीस ते पन्नास टक्के वाढविल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी

मनोर : अतिदुर्गम आदिवासी भागातील बाजारपेठ असलेल्या मनोर येथे खाजगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपली फी तीस ते पन्नास टक्के वाढविल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी कुचंबणा झाली आहे. त्यामुळे महागाईचे चटके आता रुग्णांनाही बसू लागले आहेत.येथील डॉक्टर असोसिएशनने मनोर येथील क्लिनिक व खाजगी रुग्णालयामध्ये आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या फीमध्ये वाढ केली आहे. फक्त रुग्ण तपासणी ७० रु., तपासणी व इंजेक्शन १०० रु., ड्रेसिंग ५०, रक्तदाब तपसणी ७० रु. तसेच रुग्णांच्या घरी जाण्याचे दिवसा ३०० रुपये तर रात्री ५०० रु. व्हिजिट फी निश्चित करण्यात आली आहे. तसेच सलाईन लावण्याचे ३०० रु., बाहेरून आणलेले इंजेक्शन देण्याचे ५० रु. घेतले जातात. मनोर परिसरातील ९० टक्के म्हणजे ५० ते ६० गावे ही आदिवासी आहेत. त्यामुळे ही अव्वाच्या सव्वा फीवाढ त्यांना असह्य ठरणारी आहे. (वार्ताहर)मनोर डॉक्टर असो. चा युक्तिवाद...१ डॉ. प्रशांत लोणावरे, अध्यक्ष मनोर डॉक्टर असोसिएशन यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, २० ते २५ वर्षांनी आम्ही फी वाढविली आहे. पहिले आम्ही ४० रुपये घेत होतो. आता ३० रुपये वाढवून तपासणी ७० रुपये केली आहे. २ औषधकोटा तीन दिवसांऐवजी आठ दिवसांचा देतो. त्याचे वाढीव पैसे घेतो, तसेच प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आम्हाला सध्याचे दर न परवडणारे आहेत. त्यामुळे तपासणी फी, इंजेक्शन, ड्रेसिंग, रक्तदाब, व्हिजिटची याची फी वाढविली आहे. ३ डॉ. सातवी, डॉ. संजय लोणावरे, डॉ. देव व डॉ. पडवळे चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, आम्हालाही सगळ्यांचे भाडे, लाईट बिल, वैद्यकीय कर्मचारी व मेडिसिनसाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे आम्ही पालघर येथील डॉक्टरांसारखी फी घेत नाही. आपला परिसर अतिदुर्गम आहे, गरीब आहे,याची आम्हालाही जाण आहे हे लक्षात घेऊनच किमान दरवाढ केली आहे.