शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेशन वितरणावर आता नागरिकांची नजर

By admin | Updated: August 11, 2015 23:40 IST

धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबविण्याकरीता तहसिलदार कार्यालयाने स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवरून गोदामात किती धान्य आले, किती दुकानदारांना वितरण

वसई : धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबविण्याकरीता तहसिलदार कार्यालयाने स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवरून गोदामात किती धान्य आले, किती दुकानदारांना वितरण करण्यात आले व धान्य उरले किती याची संपूर्ण माहिती देण्यात येत असते. आता पुरवठा विभागाने गोदामातून धान्य घेऊन ट्रक निघाल्याची माहिती छायाचित्रासहीत व्हॉट्सअ‍ॅपवर देण्याची योजना आखली आहे. धान्याचा ट्रक गोदामातून निघाल्यानंतर तो ट्रक दुकानात पोहोचला की नाही याची नागरीकांनी खात्री करावी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. २ वर्षात वसई विरार उपप्रदेशातील धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. स्वस्त धान्य दुकानात धान्यच पोहोचत नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी संतप्त निदर्शनेही करण्यात आली होती. याप्रकरणी २ पुरवठा निरिक्षकांना निलंबित करण्यात आले. लोकांना धान्य मिळत नसल्याचे पाहून आ. हितेंद्र ठाकूर यांनी तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना पाचारण केले व त्यांना त्वरीत वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर, तहसिलदार सुनिल कोळी व पुरवठा निरिक्षक प्रदिप मुकणे या तिघांनी एकत्र येऊन धान्य वितरण व्यवस्थेची माहिती सर्वसामान्य नागरीकांना होण्यासंदर्भात विविध निर्णय घेतले. त्यानुसार सर्वप्रथम वितरण व्यवस्थेची वेबसाईट सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पुरवठा निरिक्षक दिलीप मुकणे म्हणाले, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला चांगले यश मिळत असून लवकरात लवकर वितरण योग्य पद्धतीने होईल. (प्रतिनिधी)