शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अटक केलीच नाही; बिल्डरविरुद्ध फक्त गुन्हे

By admin | Updated: May 29, 2016 02:41 IST

नालासोपारा येथील महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व्हे नं. ४११ मधील भूखंडावर बिगरशेती प्रमाणपत्र, सिडको परवाने असे खोटे दस्तऐवज सादर करून व्यवसायीकांनी १२०० सदनिका

विरार/पारोळ : नालासोपारा येथील महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व्हे नं. ४११ मधील भूखंडावर बिगरशेती प्रमाणपत्र, सिडको परवाने असे खोटे दस्तऐवज सादर करून व्यवसायीकांनी १२०० सदनिका बांधून बँका व वित्त संस्थांची २०० कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी फक्त संबंधितांविरुद्ध कागदोपत्री गुन्हे दाखल केले. परंतु कारवाई काहीही केली नाही. त्यामुळे पोलिसांबाबत संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी नगरविकास खात्याकडे हे प्रकरण नेले. याची गंभीर दखल घेऊन नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी महापालिका कारवाईचे आदेश दिले होते. पालिकेच्याही ‘इ’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे नालासोपारा पोलिसांना दिली होती. गुन्हेगारांची वाढती संख्या व अपुरे मनुष्यबळ हे कारण पुढे करत कासव गतीने गुन्हे दाखल करण्याचे काम हाती घेत. १५ दिवसात ३१ प्रकरणात ६७ बांधकाम व्यवसायीकांवर बनावट कागदपत्रे, एमआरटीपीए कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु एकाही बांधकाम व्यवसायीकाला अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत संशय निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील काही व्यावसायीक बेपत्ता आहेत तर काही कारवाईची तमा न बाळगत शहरात मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे.गुन्हेगार असलेल्या बांधकाम व्यवसायीकांचा नाला सोपारा पोलिस अजून का शोध घेत नाहीत ? पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यावर त्यांना अटक का झाली नाही? याप्रकरणातील खरे सूत्रधार मोकाट का? त्यामुळे या पोलिसी कारवाईबाबत संशय येत असल्याचे भाजपचे मनोज पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)