लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मुख्य निवडणुकीला सहा महीन्यांचा अवकाश असतानाच सध्या होऊ घातलेल्या पाच प्रभागांच्या पोटनिवडणूकीत उर्वरित ३ प्रभागांसाठी एकुण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे सगळेच अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले असले तरी प्रत्येक उमेदवाराला कोणत्या न कोणत्या पक्षाचे बळ नक्कीच मिळणार असल्याचे चित्र आहे. जव्हार प्रतिष्ठानचे भरत पाटील यांनी स्वत: प्रभाग १ मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. जव्हार नगरपरिषदेत काही वर्षापुर्वी मोठी राजकीय उलथापालथ होऊन पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होऊ घातली आह.े यासाठी तब्बल १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर गुरुवारी ( दि. ११ ) माघारीच्या दिवशी सहा अर्ज माघे घेण्यात आले असून सध्या प्रभाग १ , प्रभाग क्र . ३ ब, प्रभाग, प्रभाग क्र . ४ अ, ४ (ब) आणि प्रभाग ४ (ई) मध्ये एकुण ११ उमेदवार रिंगणात आहेत. सुरवातीला ताकदीने न लढवली जाणारी ही निवडणूक आजघडीला प्रतिष्ठेची बनली असून प्रभाग १ मध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे.येथून जव्हार प्रतिष्ठानचे भरत पाटील, योगेश रजपुत आणि मनोज गांवडा एकमेका समोर उभे ठाकले असून पाटील हे ठाणे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी असुन गत पंचवार्षिक मध्ये राष्ट्रीवादीकडुन या नगरपरिषदांच्या निवडणूकीत ते सक्र ीय होते आता मात्र याभागातील कार्यकर्य्यांच्या बळावर ते अपक्ष आपले नशिब आजमावत आहेत तर योगेश राजपूत आण ि मनोज गांवडा हे स्थानिक या मुद्द्यावर लढत असले तरी यांना पक्षीय पाठींबा नक्कीच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रभाग क्र १ मध्ये भरत पाटील विरु द्धत राजेश राजपूत यांनी अपील दाखल केले आहे. पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैध ठरविल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान, या निवडणूकीमुळे शहराचे राजकीय ऐक्य भंगले आहे.
जव्हारला ५ प्रभागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: May 12, 2017 01:22 IST