शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या विकासाची नवी योजना

By admin | Updated: August 21, 2015 23:23 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या प्रभाग समित्याही जाहीर करण्यात आल्या. गेल्या वेळी ५ प्रभाग समित्या होत्या, त्या आता ९ झाल्या आहेत. एकूण ११५ प्रभाग असलेल्या महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ११ ते १३ प्रभाग असणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत २६ प्रभागांची भर पडल्यामुळे प्रभाग समित्यांची संख्याही वाढेल, असा सर्वसाधारण अंदाज होता. गुरुवारी झालेल्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रभाग समित्यांची संख्या ४ ने वाढली असून एकूण ९ प्रभाग समित्यांच्या माध्यमातून आता विकासकामे केली जाणार आहेत. प्रभाग ‘अ’मध्ये विरार पश्चिम भागातील प्रभागाचा समावेश आहे. प्रभाग ‘ब’मध्ये विरार पूर्वेचा भाग, प्रभाग ‘क’ चंदनसार व चांदीप क्षेत्र, प्रभाग ‘ड’ व ‘ई’मध्ये - नालासोपारा पूर्व व पश्चिम भाग व प्रभाग समिती मुख्यालय, प्रभाग ‘फ’ धानीव व पेल्हार, उर्वरित ३ प्रभागांमध्ये नवघर-माणिकपूर, बऱ्हाणपूर, चुळणे, नवघर पूर्व, वसई पारनाका, नायगाव, जूचंद्र, वालीव, गोखिवरे आदी परिसराचा समावेश आहे. (प्रतिनिधी)