शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:32 IST

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा : शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम परिसरात सध्या गर्दुल्ल्यांची संख्या वाढती आहे. या गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नालासोपारा पोलिसांनी पावले उचलत पेट्रोलिंग वाढवली आहे. अशाच गस्तीदरम्यान रविवारी पश्चिमेकडील परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.रविवारी संध्याकाळी नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था येथील यशवंत गौरव परिसरातील नाकोडा हाईट्स बिल्डिंगच्या गल्लीमध्ये ईसरार नियाज अहमद खान (२५), विवेक कैलास विश्वकर्मा (२२), रवी नारायण राठोड (२५), दिलीप शैलेंद्र यादव (२५) हे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळले.त्याच परिसरातील यशवंत गौरव रिक्षा स्टॅण्ड जवळील ड्रीम टॉवरच्या गल्लीतील झाडीमध्ये समीर चंद्रकांत जाधव (२६), अजय वर्मा (२३), अक्षित नागेश पाटील (२१) आणि तोहीद आशिफ खान (२२) हे अंमली पदार्थांचे सेवन करताना सापडले आहे.नालासोपाºयात अनेक ठिकाणी ब्राऊन शुगर, गांजा, चरस विकणाºया टोळ्या कार्यरत असून ते विकत घेण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मुंबई येथून नालासोपाºयात येतात. पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही यावर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आले आहे.भंगार गाड्या गर्दुल्ल्यांचा अड्डाशहरातील अनेक रस्त्यांच्या किनाºयालगत मोठ्या भंगार वाहनात गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी याच गाड्यांमध्ये बसून गर्दुल्ले नशा करतात. हेच गर्दुल्ले रात्रीच्या वेळी येणाºया जाणाºया लोकांना निशाणा बनवून लुटतात. विरोध केला तर हे गर्दुल्ले नशेच्या धुंदीत जीवघेणा हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही. वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात गर्दुल्यांकडून चोºया आणि मारामारीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत.गर्दुल्यांच्या अनेक तक्र ारी पोलीस ठाण्यात येत आहे. रविवारी श्रीप्रस्था परिसरात गर्दुल्यांच्या वावर वाढल्याने पेट्रोलिंगला गेलेल्या पोलिसांनी आठ जणांना अंमली पदार्थ सेवन करताना अटक केली आहे. - श्रीरंग गोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, नालासोपारा

टॅग्स :Arrestअटक