शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मृत्युचे गूढ वाढले

By admin | Updated: January 16, 2016 00:22 IST

रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे.

- शशी करपे,  वसई रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे. भार्इंदरला दोघेही गेले असताना मृतदेह मात्र नारंगी आणि वैतरणा दरम्यान आढळून आले होते. तर दोन्ही मुले केळवा येथे गेल्याचे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा आरोप करीत मुलांच्या नातेवाईकांनी मृत्युबाबतच संशय व्यक्त केला आहे. विरारमधील जितेन यादव (१६) आणि विकी झा (१६) हे दोन मित्र रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. विकी मित्राच्या वाढदिवसासाठी भार्इंदरला जातो सांगून घराबाहेर पडला होता. जितेन वही आणायला मित्राकडे जातो सांगून घराबाहेर पडला होता. दोघेही रात्री उशिरा घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरु केला होता. रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह नारंगी आणि वैतरणा दरम्यान रेल्वे रुळावर आढळल्याचे सांगून अपघाती मृत्युची नोंद केली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. पोलीस डायरीत विकीचा अपघात ७ वाजून १० मिनिटाने झाल्याची तर जितेनचा ७ वाजून ५० मिनिटांनी अपघात होऊन मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण समजून येईल. दोन्ही मुलांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जातील. तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.