शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पालिका लोगो झाला हायजॅक

By admin | Updated: September 22, 2015 03:34 IST

मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त शिवसेना व मनसेने पालिकेला एका आठवड्यात निर्णय घेण्याचे अल्टिमेटम दिले असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.लोकमतनेदेखील यावर सतत वृत्तांकन करून त्याच्या हायजॅकची कल्पना प्रशासनाला करून दिली होती. परंतु, त्यावर गंभीर नसलेल्या कामचुकार प्रशासनाने अखेर लोगो हातचा गमावला असून त्याची नोंदणी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने अलीकडेच करून घेतली आहे. ही बाब लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून उजेडात आणल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच स्थानिक राजकीय मंडळींतदेखील त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत, आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, असा प्रकार निंदनीय असून पालिकेचा घटक असलेल्यांकडून अशी अपेक्षा नाही. भविष्यात पालिकासुद्धा खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने एका आठवड्यात लोगोचा निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. तर, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम यांनी सांगितले की, गेल्या २४ वर्षांत लोगो नोंदणीकृत न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचा खुलासा प्रशासनाने जनतेसमोर करावा.