शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेचे लॉ खाते फेल

By admin | Updated: February 15, 2017 23:34 IST

अनधिकृत बांधकामांविरोधात असलेले दावे निकाली काढण्यात वसई विरार महापालिकेचा विधी विभाग अपयशी ठरला आहे.

शशी करपे /वसईअनधिकृत बांधकामांविरोधात असलेले दावे निकाली काढण्यात वसई विरार महापालिकेचा विधी विभाग अपयशी ठरला आहे. अनधिकृत बांधकामासंबंधी कोर्टात ७४७ दावे दाखल आहेत. त्यातील फक्त दोन दावे निकाली निघाली असून ८२ दाव्यांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. मात्र, ६६३ दाव्यांवरील स्थगिती उठवण्यात विधी विभाग अपयशी ठरला आहे. कोर्टात दावे लढण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत वकिल फी पोटी तब्बल ३ कोटी ९४ लाख ४ हजार ८७० रुपये अदा केले आहेत. महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधातील दावे लढण्यासाठी वकिलांची फौज उभी केली आहे. सध्या महापालिकेचे एकूण ८६७ दावे कोर्टात दाखल आहेत. त्यातील तब्बल ७४७ दावे अनधिकृत बांधकामाशी संबंधित आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे दावे लढण्यासाठी यातील सर्वाधिक फी अदा केली गेल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून उजेडात आले आहे. सर्वसामान्य जनतेने कर रुपाने भरलेले कोट्यवधी रुपये वकीलांच्या फीपोटी खर्च करून केवळ दहा टक्के प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगिती उठवण्यात यश आलेले आहे. बांधकामे पूर्णपणे अनधिकृत असतांनाही महापालिकेकडून चुकीच्या आणि त्रुटी असलेल्या नोटीसा बजावल्या जातात. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे स्वत:च्या वकिलांमार्फत न्यायालयाकडून स्थगित आदेश मिळवतात. महापालिकेकडून अशा प्रकरणांमध्ये सुधारीत नोटीस बजावली जात नाही किंंवा कॅव्हेटही दाखल केले जात नाही. परिणामी स्थगिती कायम राहिल्याने बिल्डर बांधकाम पूर्ण करून विकून मोकळा होतो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेकडून सविस्तर माहिती आणि कागदपत्रे वकिलांना पुरवले जात नाहीत. परिणामी हाती असलेल्या कागदपत्रांच्या आधारे वकिल कोर्टात बाजू मांडतात. पण ती लंगडी ठरल्याने निकाल महापालिकेविरोधात जातात. यात संबंधित अधिकारी आणि बिल्डरांचे आर्थिक हितसंंबंध गुंतल्याचाही आरोप केला जातो. दरम्यान, अ‍ॅड. दिगंबर देसाई यांच्याकडे एकूण ६१७ दावे असून त्यापैकी ५२३ दावे अनधिकृत बांधकामाशी संंबंधित आहेत. त्यांना वकिल फी पोटी महापालिकेने (यात अनधिकृत बांधकामांसह इतर १०४ दाव्यांचाही समावेश आहे) २ कोटी ४३ लाख ९७ हजार ८५० रुपये अदा केले आहेत. त्यानंतर अ‍ॅड. साधना धुरी यांच्याकडे विविध १९७ दाव्यांची कामे आहेत. यातील १९३ दावे अनधिकृत बांधकामांशी संंबंधित आहेत. यातील २५ दाव्यांवरील स्थगिती उठवण्याचे काम त्यांनी केले असून १६८ दाव्यांवरील स्थगिती कायम आहे. त्यांनी वकिल फी पोटी महापालिकेने (यात इतर चार दाव्यांचा समावेश आहे) २२ लाख ७८ हजार २०० रुपये अदा केले आहेत. अ‍ॅड. संतोष खळे यांच्याकडे अनधिकृत बांधकामांचे ३९ दावे असून सर्व दाव्यांवरील स्थगिती कायम आहे. तर अ‍ॅड. अतुल दामले आणि अ‍ॅड. स्वाती सागवेकर यांच्याकडे एकूण १४ दावे असून त्यात २ दावे अनधिकृत बांधकामांशी संंबंधित आहेत. दोन्हीही दाव्यांवरील स्थगिती कायम आहे. या वकिलांना एकूण १४ दाव्यांपोटी ९७ लाख ४२ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.