शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएची सुनावणी हाणून पाडली, चार तासांच्या सुनावणीला विरोध; ५ हजारांहून अधिक वसईकरांचे दीड तास आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 05:49 IST

प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले.

वसई : प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. गावागावात सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आयुक्त आणि राज्यसरकारशी बोलून पुढील सुनावणी घेतली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी जाहिर केले. मात्र, आंदोलनकर्ते निघून गेल्यानंतर अधिकाºयांनी पुन्हा सुनावणी घेण्याचा केलेला प्रयत्नही कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याला वसईतून तीव्र विरोध असून सुमारे चाळीस हजार हरकती एकट्या वसईतून नोंदवण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियु्क्ती केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता नालासोपारा येथील दामोदर हॉलमध्ये एमएमआरडीएच्या प्रमुख नियोजनकार उमा उड्ूमुनिल्ली आणि माजी नियोजनकार डी. के. पाठक यांनी सुनावनीला सुरुवात केली. मात्र, माजी सरपंच रॉबर्ट डाबरे यांनी त्रिसदस्यीय समितीपैकी फक्त एकच सदस्य हजर असल्याने सुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगून जोरदार विरोध केला. त्यानंतर जनतेचा विकास आराखडा मंचाचे निमंत्रक मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीला प्रत्येक हरकतदाराला बोलावलेच पाहिजे. एकाच दिवशी सुनावणी न घेता सलग सुनावणी घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. तर पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक आणि जनआंदोलनाच्या डॉमणिका डाबरे यांनी शहरात सुनावणी घेण्यास विरोध करून गावागावातच सुनावणी झाली पाहिजे, असे सांगून ही सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरल्याने गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दीड तास गोंधळ सुरु होता. आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, प्रा. विन्सेंट परेरा, रॉबर्ट डाबरे, एव्हरेस्ट डाबरे, जनआंदोलनाचे मिलिंद खानोलकर आदींसह कार्यकर्त्यांनी थेट अधिकाºयांना घेराव घालून सुनावणी बंद पाडली. मात्र, एमएमआरडीएच्या उमा उडूमुनिल्ली यांनी गोंधळ सुरु असतानाही सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता. त्यामुळे वातावरण तप्त झाले होते. एमएमआरडीए चलो जाव, हमारे गाव मे हमारा राज या घोषणेने सभागृह दणाणून गेले होते. सभागृह गर्दीने ओसंडून वाहत असताना खाली देखिल प्रचंड संख्येने लोक जमा झाले होते. लोकांचा संताप अनावर झाल्याने वातावरण तंग होऊ लागले होते. त्यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हस्तक्षेप केला. सुनावणीस लोकांची हरकत नाही. मात्र, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून होत असलेली सुनावणी मान्य नाही. विकासाला वसईकरांचा विरोध नाही. पण, लोकांना उध्वस्त करून विकास होत असेल तर तो मान्य नाही. वसईकरांनी पोर्तुगीजांना हाकलून दिले होते हा इतिहास आहे. म्हणून सुनावणी रेटून नेण्याचा प्रयत्न कदापीही सहन केला जाणार नाही. त्यासाठी गावागावात सुनावणी घ्या. गावकरी सहकार्य करतील असे आवाहन फा. दिब्रिटो यांनी अधिकाºयांना केले. सभागृहातील संताप लक्षात घेऊन पाठक यांनी सुनावणी स्थगित केली.हाही प्रयत्न फसलासुनावणी स्थगित झाल्याने कार्यकर्ते आणि हजारो लोक माघारी वळले. पण, एका तासातच एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सुनावणीचे सोपस्कार पार पाडण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागताच सुनील डिसिल्वा, रॉबर्ट लोपीस, डेव्हीट मच्याडो यांच्यासह जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात धाव घेऊन हाही प्रयत्न हाणून पाडला. 

टॅग्स :Governmentसरकार