शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएने धरले गावकऱ्यांना वेठीस

By admin | Updated: June 19, 2017 03:43 IST

एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना

शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कवसई : एमएमआरडीएने प्रारुप आराखड्याविरोधात हरकती नोंदवलेल्या गावकऱ्यांची सुनावणी सुरु केली आहे. मात्र, ती साठी एकाच दिवशी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयाबाहेर चार तास ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले असून यापुढील सुनावणी गावागावात जाऊन घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पालघर, ठाणे, रायगड जिल्हयासाठी एमएमआरडीएने प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्यामुळे भूमीपुत्र देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करून गावकऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्याच्या विरोधात वसईत विविध संघटनांनी मोठे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे एकट्या वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातून तब्बल साठ हजारांहून अधिक हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यावर आता एमएमआरडीएने सुनावणी सुरु केली आहे. मात्र, शनिवारी घेण्यात आलेल्या सुनावणीसाठी दोन हजार गावकऱ्यांना वांद्रे येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते. गावकऱ्यांना चार तास ताटकळत उभे ठेवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.त्यात काही वृद्ध, आजारी, महिला होत्या. त्यांना बसण्याची कोणतीही सुविधा नसल्याने उन्ह्यात उभे रहावे लागले होते. कार्यालयात बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने बहुतेकांना उपाशी रहावे लागले. इतकेच नाही तर गावकऱ्यांना कार्यालयातील प्रसाधनगृहात जाण्यासही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे महिलांचे हाल झाल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी केला आहे. एवढे करूनही सुनावणीही घेण्यात आली नाही. काही सदस्यांना आतमध्ये बोलावून जाहिर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात वैयक्तिक सुनावणीचा हक्क असतांना एमएमआरडीएने जाहिर सुनावणीचा प्रयत्न करून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावकऱ्यांची गैरसोय टाळावी व त्यांना आपले म्हणणे लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही दडपणाशिवाय मांडण्यात यावे याकरता ही सुनावणी गावांमध्येच झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली होती. ही मागणी दुर्लक्षित करून गावकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सिडकोने ज्यापद्धतीने वसईत गावागावात जाऊन सुनावणी घेतली. त्याचपद्धतीने एमएमआरडीएनेही सुनावणी घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा या दडपशाहीविरोधात संतप्त गावकरी पुन्हा आंदोलन करतील असा गंभीर इशारा एमएमआरडीएला देण्यात आला आहे.