शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पालिका चिन्हाचा गैरवापर

By admin | Updated: September 19, 2015 23:34 IST

पालिकेच्या चिन्हाच्या (लोगो) नोंदणीसाठी गेल्या २४ वर्षांपासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्य न दाखविल्याने त्याची अधिकृत नोंदणी अद्याप होऊ शकलेली नाही.

- राजू काळे,  भार्इंदर पालिकेच्या चिन्हाच्या (लोगो) नोंदणीसाठी गेल्या २४ वर्षांपासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्य न दाखविल्याने त्याची अधिकृत नोंदणी अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे चिन्हाचा गैरवापर शहरासह शहराबाहेर होऊ लागल्याचे उजेडात येऊनही प्रशासन त्याबाबत गांधारीची भूमिका वठवत असल्याची चर्चा शहरवासीयांत सुरू झाली आहे.१९९१ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपालिकेने आपल्या हद्दीतील ९ ग्रामपंचायतींसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मिठागरे, डोंगराळ भाग आदींचा समावेश असलेले चिन्ह वापरात आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर, २००२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेसाठीही हाच लोगो व्यवहारात आणला जात आहे. कालांतराने पालिकेने सुरू केलेल्या वेबसाइटवर केवळ सोपस्कार पार पाडण्याच्या उद्देशाने वेबसाइटवर चिन्ह अपलोड केले आहे. परंतु, सामान्य नागरिकांना लोगोची माहिती व्हावी तसेच त्यात समाविष्ट केलेल्या बाबींविषयी आदर व्यक्त होण्याच्या उद्देशाने अद्याप कोणतीही माहिती वेबसाइटवर उपलब्ध केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेल्या या चिन्हाची प्रशासनाने अद्याप शासकीय नोंदणी विभागाकडे नोंदच केली नसल्याचे उजेडात आले आहे. हा धक्कादायक प्रकार काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २० फेब्रुवारी २०१३ रोजीच्या महासभेत सभागृहाच्या निदर्शनास आणला होता. त्या वेळी त्याच्या अधिकृततेसाठी लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांतही हे चिन्ह अद्याप अधिकृत होऊ शकले नाही. यामुळे अनेक जण पालिकेचा कोणताही संबंध नसताना खाजगी वाहनांवर तसेच त्यात खाडाखोडकरून हवे तसे वाक्य वा शब्द लिहून त्याचा गैरवापर करीत आहेत. हे चिन्ह प्रामुख्याने शहराचेप्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या आसनासह पालिकेच्या प्रत्येक वाहन व नगरसेवकांच्या गाड्यांवर झळकाविण्यात येत आहे. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी पालिकेची वेबसाइट अहमद साजीद या बांगलादेशी नागरिकाने हॅक केली होती. त्यात या लोगोच्या नोंदणीची कल्पना अहमद यास आली असती तर कदाचित पालिकेला विनानोंदणीकृत चिन्हाचा मालकी हक्क गमवावा लागला असता. हा प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.