शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या मुजोरीने संताप

By admin | Updated: March 28, 2017 05:06 IST

हजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते

रवींद्र साळवे /मोखाडाहजारो रुपयांचे वीज बिल घरगुती ग्राहकांना आकारल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी नोटीस पाठविली जाते. तसेच त्यांना संधी दिली जाते. मात्र, मोखाड्यातील धामणशेत येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट वीज मीटर काढून नेल्याने संतापाचे वातावरण आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता या अधिकाऱ्यांना मीटर काढून नेण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवाल विचारला जात आहे.धामणशेत येथील तीस ते पस्तीस मीटर खोडाळा महावितरणचे अधिकारी पी. टी. वाघ यांनी काढून नेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मुळात तेवढी वीज वापरलीच नसल्याने अंदाजे झालेली बील आकारणी आमच्यावर अन्याय करणारी असल्याची त्यांची तक्रार आहे. तिची दखल न घेता मीटर काढून नेल्याने ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यापासून जव्हार, विक्रमगडसह मोखाड्यातील मीटर धारकांना वीजबिल भरून सुद्धा पुन्हा पुढच्या महिन्यात हजारोंच्या वाढीव बिलाची आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये फसवणूक होत असल्याची भावना आहे. या प्रकरणी संबधीत एजन्सीवर फौजदारी कारवाई सुद्धा झाली आहे. यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. तरी सुद्धा भरमसाठ आकारणी करून वसुली केली जात आहे.यात महत्वाची बाब म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेने वीज बिल भरणा बंद केल्यानंतर संबधित एजन्सीकडे वीज बिल भरले जावे, असे फलक सुद्धा या कार्यालयात लावले होते. यानंतर दोन महिन्याचा तालुक्याचा २४ लाखा पेक्षा अधिक भरणा कार्यालयाला प्राप्त झाला नसतांना या कार्यलयाने कोणतीच कार्यवाही केली नाही आणि यात ग्राहकांची फसवणूक झाली आहे परंतु महावितरण ग्राहकांनाच दोषी ठरवित असून याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागत आहेमहावितरणाच्या या पाठराख्या भूमिकेमुळे खाजगी कंपन्यांनी वीज बिल वसुलीच्या नावाखाली लाखो रूपयांचा भ्रष्टचार केला आहे. आता या रकमेची भरपाई करण्यासाठी महावितरण कोणतेही रिडींग न घेता वाढीव वीजबिल आकारून ग्राहकांची मोठी लूट करीत आहेत. त्यातच वाढीव मीटर आकारलेल्या ग्राहकांना तुम्ही बिल भरत नसल्याचे कारण सांगून मीटर काढून नेण्याचा मुजोर अधिकाऱ्यांनी सपाटा लावला असल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत वेळीच कारवाई न झाल्यास महावितरणविरोधात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आधीच अघोषित भारनियमन, विजेच्या दाबात चढउतार होणे यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. त्यात ही नवी भर पडली आहे.