शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

वसई-विरारमध्ये बाजारपेठा राख्यांनी फुलल्या

By admin | Updated: August 22, 2015 22:21 IST

रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई-विरार परिसरातील बाजारपेठा विविधरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बहुतेक चाकरमान्यांना शनिवार-रविवार सुटी असल्याने

वसई : रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई-विरार परिसरातील बाजारपेठा विविधरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बहुतेक चाकरमान्यांना शनिवार-रविवार सुटी असल्याने आज बाजारपेठांमध्ये राखीखरेदीसाठी महिला व तरुणींची मोठी गर्दी होती. यंदा आदिवासी महिलांनी बनविलेल्या बाम्बूच्या इको-फ्रेण्डली राख्या व चिनी बनावटीच्या राख्यांचे मोठे आकर्षण पाहायला मिळाले. दरवर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनच्या सहा दिवस अगोदर बाजारात राख्या विक्रीला आल्या आहेत. २० ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी मिळणाऱ्या राख्यांच्या तुलनेत यंदा भाव चांगलेच वधारले आहेत.भारतीय बाजारपेठांवर चिनी वस्तूंचे आक्रमण सुरू असताना यंदा त्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या व आकारांच्या राख्या बाजारात उतरविल्या आहेत. भारतीय राख्यांच्या तुलनेत त्यांचे भावसुद्धा खिशाला परवडतील असेच असल्याने देशी उत्पादनांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे.दूरवरच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पूर्वी ताई-मार्इंची पोस्टात मोठी गर्दी पाहायला मिळायची. आता ती जागा कुरिअर कंपन्यांनी घेतलेली आहे. राखीविक्रीसंदर्भात बोलताना वसईतील अजय मेहता म्हणाले, दरवर्षी वसई-विरार उपप्रदेशात रक्षाबंधननिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होत असते.परंतु, यंदा बाजारात चिनी राख्यांचे आक्रमण झाल्यामुळे देशी राख्यांना मागणी कमी झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी सामाजिक संस्थांनी यंदा इको-फ्रेण्डली राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांनाही बाजारात चांगली मागणी आहे.