शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या किनाऱ्यावर समुद्री कासव

By admin | Updated: March 18, 2017 03:03 IST

तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात.

डहाणू : तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात. दरम्यान एका बाजूने हा आकडा वाढत जाणारा असून विणीच्या हंगामात खोऱ्याने अंडी घालणारी परंपरा खंडीत होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. डहाणू तालुक्याला सुमारे ३५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याने डॉल्फिन, समुद्री कासव तसेच माशांच्या विविध प्रजाती माठ्या प्रमाणात आहेत. प्रतिवर्षी किमान ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेत आढळणाऱ्या या कासवांची संख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. मासे पकडण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक पद्धतीची जाळी हे त्यामागील कारण असले. तरीही किनाऱ्यालगत सुरू तसेच कांदळवनांचे घटते प्रमाण, थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारा अवैध रेती उपसा, खाजण क्षेत्रावर भराव तसेच उच्चतम भरती रेषेच्या मर्यादेचे खुल्लेआम उल्लंघन करून बांधकामाचे पेव फुटणे ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. वन, महसूल, खारभूमी, मेरीटाईम आणि स्थानिक स्वराज्य संस्था आदि प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे ऱ्हासाचे प्रमाण वाढले आहे. देशात पर्यावरणदृष्ट्या आठ क्षेत्र संरिक्षत म्हणून घोषीत असून त्यामध्ये डहाणूचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००२ साली डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करून निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पर्यावरण विरोधक कृत्यांवर अंकुश आला असून हा ठेवा अबाधित राखण्यास मदत झाली आहे. मात्र काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली १९९१ चे नोटिफिकेशन हटवण्याची मागणी येथील काही गटाकडून केली जात असून लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी त्याची री ओढली आहे. डहाणूचे पर्यावरण शाबूत राहण्यात प्राधिकरणाचा महत्वाचा वाटा आहे. धनाढ्य मंडळी प्रशासनावर राजकीय दबाब आणून नोटोफिकेशन हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करित आहेत. डहाणूचा समतोल विकास हा पर्यावरणाचा आधारिबंदु असल्याने पर्यावरणाशी तडजोड करणारा कोणताही निर्णय विनाशाची नांदी ठरेल.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक