शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:35 IST

जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ

जव्हार : जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ वाहने घसरून शुक्रवारपासून ते सोमवार या काळात चार ते पाच अपघात घडले आहेत. पाऊस सुरु असला कि, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचा ताबा सुटून घडलेल्या अपघातांमध्ये २७ जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.सततच्या अपघाताने गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासटवाडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मे २०१८ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र ते करतांना ठेकेदाराने आॅइलमिश्रीत डांबर वापरल्यामुळे रस्ता निसरडा होवून, वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत.एका अपघातात चालकाचा जीप वरील ताबा सुटून तिने रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या महिलेला उडविले. तर त्याच ठिकाणी शनिवारी झाडावर आदळून बसचा अपघात झाला. रविवारी तिसºया दिवशी वाडा जव्हार या बसने उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली तर उभ्या असलेल्या बसला मागून येऊन पिकअप धडकली. सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि मागून येणाºया ट्रकचा ताबा सुटल्यामुळे ट्रकही त्याच ठिकाणी झाडाला जाऊन आदळली, मात्र यात बस मधील प्रवासी सुदैवाने जखमी झाले नाहीत. तर पाऊस सुरु असतांनाही बाईकस्वरांचे लहानमोठे अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.कासटवाडी गावाजवळ स्पीड ब्रेकर नाही. त्यातच रस्ता सरळ असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. त्यामुळे रोजच अपघात घडताहेत. बांधकाम विभागाने येथे स्पीड ब्रेकर निर्माण करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याच ठिकाणी अगोदरच वन विभागाचा तपासणी नाका आहे. मात्र या नाक्यावर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी राहत नाही. जर का वन विभागाचा तपासणी नाका सुरु असता, तर वाहनांवर थोडेफार नियंत्रण असते, असेही गावक-यांकडून सांगण्यात येते. तसेच या ठिकाणी पोलीसचौकी असावी त्यामुळे तिच्या दराºयाने वाहकावर नियंत्रण राहील.मार्च २०१८ ला हा रस्ता राज्य महामार्गकडे हस्तांतरीत करण्यात आला तरीही सा. बां. विभागाने ठेकेदाराला मे २०१८ मध्ये रस्ता तयार करण्यास परवानगी दिली मात्र ठेकेदाराने घाईघाईत थातूर मातूर काम करून रस्त्यावर वर आॅइल व केरोसीन मिश्रित माल वापरून रस्ता तयार केला आहे, यात शाखा अभियंता व बांधकाम विभागाचे अन्य अधिकारीही सामिल आसून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.या रस्त्याचा काही भाग यंदा तयार करण्यात आला आहे, मात्र रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून वाहन चालकाने या भागात वाहने कमी गतीने चालवले तर अपघात घडणार नाहीत असा सल्ला शाखा अभियंता डी. डी. पाटील यांनी दिला. जर रास्ता राज्य महामार्ग कडे वर्ग केला होता तर ठेकेदाराला या वर्षात काम का करू दिले? काम सुरू असतांना राज्य महामार्गचे अधिकारी व कर्मचाºयांनी हे बोगस काम का करू दिले ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची उत्तरे मात्र कोणाकडेच नाहीत. अशी अवस्था आहे.