शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कुंर्झे ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव बहुमताने संमत

By admin | Updated: October 25, 2016 03:27 IST

या तालुक्यातील कुंर्झे या १८ पाड्यांच्या व पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या गावाने दारुबंदीचा ठराव संमत करून नवा आदर्श निर्माण केला आहे. याच गावत दारु मुक्तीचे केंद्र

- संजय नेवे,  विक्र मगडया तालुक्यातील कुंर्झे या १८ पाड्यांच्या व पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या गावाने दारुबंदीचा ठराव संमत करून नवा आदर्श निर्माण केला आहे. याच गावत दारु मुक्तीचे केंद्र चालवणारे, पंचायत समितीचे सदस्य विजय वेखंडे यांच्या पुढाकरातून या गावातील दारुविरुद्ध लढणाऱ्या बायकांनी त्यांना साथ दिली. या रणरागीणी साध्या आहेत. शेतात, घरात राबणाऱ्या, गुराढोरांची काळजी घेणाऱ्या, पोरांना धपाटे घालत शाळेत घालणाऱ्या, चुलीशी राबणाऱ्या, काही अक्षर ओळख नसणाऱ्या तर काहीजणी जेमतेम काही इयत्ता शिकलेल्या. त्या स्वत:साठी, आपल्या संसारासाठी, मुलाबाळाचा उज्वल भविष्यासाठी कुटुंबासाठी लढताहेत. त्यांनी दारू बंदीचा प्रयत्न केला आहे. इथे बाईची लढाई सुरु झाली आहे. घरापासून. त्यांच्या घरातल्या पुरुषांचे आणि पर्यायाने त्यांचं, पोराबाळांचं जगणं विस्कटून टाकणारी दारू गावातून हद्दपार करण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्यात. या लढाईत त्या स्वत:च्या नवऱ्याविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, समाजातल्या बड्या हस्तीविरुद्ध, राजकारण्यांविरुद्ध उभ्या आहेत. दबाव आहे, तरीही त्यांचे लढणे चालू आहे. त्याच्यासोबत आहेत ते विक्र मगड पोलिस म्हणून त्यांच्या पंखाना बळ आले आहे.विक्रमगड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली कुंर्झे ग्रामपंचायतीने दि. २० आॅक्टोबर २०१६ रोजी आयोजीत केलेल्या विशेष महिला ग्रामसभेत उपस्थित महिलांनी १०० टक्के मतदानाने दारु बंदीचा ठराव संमत करून पालघर जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. पंचायत समितीचे सदस्य असलेले विजय वेखेंडे यांनी दारु मुक्तीचा पहिला प्रयत्न आपल्या गावापासून सुरु केला आहे. दारू सोडा संसार जोडा हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. या बाबत त्यानी महिलांचा विशेष सभेत माहिती दिली. १०० टक्के गावाच्या दारु बंदीसाठी उपाय योजना म्हणून या वेळी गावातील महिलांची समिती स्थापन केली आहे. दारू बनविणाऱ्याना या समितीच्या महिलांकडून प्रथम विनंती केली जाणार आहे की दारू बनवू नका. त्यानंतरही जर बनावली तर पोलिसांकडे तक्र ार केली जाईल. या वेळी या गावात दारु करणाऱ्यांवर पोलिस निरीक्षकांनी कडक कारवाई केली असे आश्वासन दिले आहे. जर दारु करणाऱ्यांनी ऐकले नाही तर येत्या १५ दिवसात ठिकठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. या वेळी विक्र मगडचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानी बोलताना संगीतले की कुंर्झे गावतील महिलांनी दारूबंदी साठीचा प्रयत्न चालू केला आहे तो कौतुकास्पद आहे. यातूनच अनेक संसार वाचणार आसून. विक्र मगड पोलिसाचे सहकार्य नेहमी या महिलांना असेल असे आश्वासन त्यानी या वेळी दिले. या महिलांचा विशेष सभेत या ग्रामसभेला विजय शिंदे तसेच तराळ मॅडम पं.स. विक्रमगड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कुंर्झे ग्रा.पं. चे सरपंच सुनिल वाजे, उपसरपंच ज्योती वेखंडे, ग्रा.पं. सदस्य भिमरा मॅडम, गिंभल मॅडम, रिंजड मॅडम, महेश भोईर, पोलिस पाटील विभा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, तंटामक्ती अध्यक्ष बच्यू ठाकरे, टोलूराम चौधरी, हिरामण शेलार, बाबू रिंजड, उमेश दुमाडा, दिलीप काकड या ग्रामस्थ व सर्व महिलांनी कुंर्झे गावात रॅली काढून दारु बंदीच्या घोषणा देवून लोकांमधे दारु बंदी विषयी जनजागृती केली.ग्रामीण भागात दारु चा वेसनापाई अनेक संसार, तरु ण उध्वस्त झालेत, शासन अनेक योजना राबवतय परंतु दारु चा व्यसनापाई अनेकजण उध्वस्त झाले असून, शासनाने ग्रामीण भागातील दारु बंदी साठी एखादी प्रभावी योजना राबवायला हवी. किवा दारु विक्र ी परवाने देताना कडक निर्बंध घालायला पाहिजे. -विजय वेखंडे, पंचायत समिती सदस्य, विक्र मगड