शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:30 IST

पाण्याची गळती : परिसरातील शेतीला होतो अपुरा पाणीपुरवठा

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्याअंतर्गत शेताला पाणीपुरवठा केला जातो. मात्र १५ वर्षांपासून शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेताला अपुरा पाणीपुरवठा होतो. परिणामी, कालव्याच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर जमीन सूर्या कालवाअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाली, खनिव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटने, चारोटी, कासा, सारणी, निकावली, ऊर्से, रानशेत, साखरे, गोवणे, दाभोण,  तर पालघर तालुक्यातील सोमटा, बऱ्हाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, अकेगव्हाण, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव,  गुंदले, वाळवे अशा सुमारे  ९० ते १०० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणीगळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर व  दगडांनी पिचिंग केले आहेत. आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिकचे अस्तरीकरण केले, मात्र नंतर बऱ्याच काळापर्यंत दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी कालव्यांचे बांधकाम आणि प्लास्टर पाण्यात वाहून गेले आहे.

काही ठिकाणी तर कालव्यांचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले  असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाऱ्या काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बऱ्याच शेतकऱ्यांनी भातशेती करणे बंद केले आहे, तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाऱ्या शेतालादेखील योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात. तसेच कालव्यातून दुरुस्तीअभावी पाण्याची गळती होत असल्याने मुख्य कालव्याच्या टोकाकडील गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पिकांवर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी (बिल) भरूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. - सुनील जाधव, शेतकरी.